शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

जाहिरात करणाऱ्या वकिलांविरुद्ध कारवाईचा बार कौन्सिलचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 2:37 AM

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाकडून बार असोसिएशनला पत्र

- खुशालचंद बाहेती औरंगाबाद : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून स्वत:ची जाहिरात करणाºया वकिलांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देणारे पत्र सर्व जिल्हा बार असोसिएशनला पाठविले आहे. प्रसारमाध्यम तसेच व्हॉटस्अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवरील जाहिरातींचीही दखल घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.वकिलांच्या जाहिरातींबद्दलच्या काही घटना लक्षात आल्यानंतर हे पत्र पाठविण्यात आले आहे. बार कौन्सिल आॅफ इंडियाने अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट अंतर्गत वकिलांच्या वर्तणुकीबद्दल काही नियम बनविले आहेत. हे नियम वकिलांना बंधनकारक आहेत. बार कौन्सिल नियम ३६ प्रमाणे वकिलांना स्वत:ची जाहिरात करण्यास प्रतिबंध आहेत. वकिलांसाठीच्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, वकिलांची नेमप्लेट ही योग्य साईजची असावी. नावाच्या पाटीवर किंवा लेटरहेडवर ते बार कौन्सिलचे पदाधिकारी आहेत किंवा होते याचा उल्लेख नसावा. ते एखाद्या प्रकारच्या खटल्यात विशेष तज्ज्ञ असल्याचा उल्लेखही नसावा किंवा ते पूर्वी न्यायाधीश किंवा सरकारी अभियोक्ता, अ‍ॅडव्होकेट जनरल असतील तर त्याचाही उल्लेख नसावा. वकिलांच्या जाहिरातीसंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यास ती व्यावसायिक गैरवर्तणूक समजून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बार कौन्सिल आॅफ इंडियाचे असे आहेत नियमप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करून काम मिळवण्यास प्रतिबंध.सर्क्युलर, वैयक्तिक पत्रव्यवहार, एजंटांमार्फत काम मिळविण्यास प्रतिबंध.वृत्तपत्रात स्वत:च्या केससाठी स्वत:चे फोटो छापण्यास पाठविणे, प्रतिक्रिया पाठविण्यास प्रतिबंध.वकिली हा व्यवसाय नाही. वकिलांचे काम हे मालाच्या विक्रीचे काम नाही. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेमुळे विधि व्यवसाय बदनाम होऊ नये.(न्यायमूर्ती कृष्णा अय्यर - बार कौन्सिल आॅफ महाराष्टÑ वि. एम. व्ही. दाभोलकर)