बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ
By Admin | Updated: September 29, 2015 00:45 IST2015-09-29T00:38:58+5:302015-09-29T00:45:00+5:30
लातूर : ‘गणपती बाप्पा मोरया,़़़ पुढच्या वर्षी लवकर या’़़़ च्या गजरात रविवारी लाडक्या गणरायाला निरोप दिला़ ढोल, ताशाच्या गजरात मिरवणुका काढून

बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽ
लातूर : ‘गणपती बाप्पा मोरया,़़़ पुढच्या वर्षी लवकर या’़़़ च्या गजरात रविवारी लाडक्या गणरायाला निरोप दिला़ ढोल, ताशाच्या गजरात मिरवणुका काढून श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले़ मानाचा गणपती भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळच्या गणेश मूर्तींचे पहिल्यांदा विसर्जन झाले़ त्यानंतर मानाचा गणपती औसा हनुमान गणेश मंडळाचे सर्वात शेवटी विसर्जन करण्यात आले़ रविवारी दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला होता़ ढोल-ताशांच्या गजरात आणि कलापथकाचे सादीकरण करीत या मिरवणुकांना प्रारंभ झाला़ शिवाजी चौक, गांधी चौक, सुभाष चौक, गंजगोलाई येथे गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले़ महानगरपालिका आणि भांडी असोसिएशनच्या वतीने गंजगोलाईत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले़
यंदा गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव उत्सव मिरवणुकीवर झाला़ दुपारपासून गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली़ मानाचा गणपतीनंतर इतर विविध मंडळांनी टप्प्याटप्यांनी आपल्या उत्सव मिरवणुका काढल्या़ या मिरवणुकीचे परीक्षण करण्यासाठी महापालिकेच्या आणि भांडी असोसिएशनच्या व्यासपीठावर परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली़ प्रत्येक गणेश मंडळाची मिरवणूक ही आगळी-वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरली़ पारंपरीक वाद्यांसह अत्याधुनिक डीजे आणि डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली़
विविध गणेश मंडळाच्या वतीने समाजातील विविध प्रश्नांवर प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले़ रक्तदान, पर्यावरण, शहरातील विविध समस्या, दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकरी आत्महत्या या प्रमुख विषयांवर प्रबोधन करणारे फलक, देखावे मंडळांनी सादर केले़
मंडळाने मिरवणुकीत स्वयंशिस्त पाळल्यामुळे कुठलाही गोंधळ झाला नाही़ प्रत्येक मंडळाला ठरवून दिलेल्या वेळेवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली़ मंडळाच्या ठिकाणापासून ते विसर्जन ठिकाणापर्यंत मिरवणुकीसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन दुपारपासूनच मिरवणुकांना सुरुवात झाली होती़ मिरवणुकी दरम्यान, झांज पथक, टिपरी, ढोलपथकांच्या सादरीकरणाने गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले़ गंजगोलाईत आल्यानंतर प्रत्येक मंडळाच्या पथकाने आपल्या कल्पक उपक्रमाचे सादरीकरण केले़ यावेळी लातूर भांडी असोसिएशन आणि महानगरपालिकेच्या वतीने मंडळ पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला़ (प्रतिनिधी)
लातूर शहरातील गणेश मंडळांना विसर्जनासाठी चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती़ शहरातील विविध गणेश मंडळांना जे ठिकाण जवळ असेल, त्या मार्गावर मिरवणूक काढण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या होत्या़ साई, बांधकाम भवनच्या पाठीमागील विहीर, कव्हा आणि सिद्धेश्वर देवस्थान परिसरातील बारव येथे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले़
बकरी ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्हाभरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ शहरात जवळपास ६०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ शहरातील फिक्स पॉर्इंटवर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती़ तर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते़
४सुभाष चौक, हनुमान चौक आणि गंजगोलाईत मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत सादर केलेल्या धनगरी नृत्याने अनेकांचे लक्ष वेधले़
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी वृक्ष लागवड, जलपूनर्भरण, पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार या उपक्रमांचे सादरीकरण विविध फलकाच्या माध्यमातून करण्यात आले़ तर पर्यावरणाचा समतोल ढासाळल्यानंतर होणारे परिणाम याबाबतची जाणीव या देखाव्याच्या माध्यमातून गणेश भक्तांना करुन देण्यात आली़ वृक्ष लागवडीशिवाय पर्यावरणाचा समतोल साधता येणार नाही, हा संदेश विसर्जन मिरवणुकीतून गणेश मंडळांनी दिला़ पर्यावरणावरील देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले होते.
दुपारपासूनच मिरवणुकीला सुरुवात केलेल्या गावभागातील गणेश मंडळाने खंडेराया आणि बानू यांच्या वेशातील सादरीकरण हे प्रामुख्याने सर्वच गणेश मंडळांच्या मिरवणुकीतील देखाव्यापेक्षा आगळे-वेगळे सादरीकरण होते़ खंडेराया आणि बाणूची जोडी ही अनेकांचे लक्ष वेधून घेत होती़ गंजगोलाईत सादर करण्यात आलेल्या उपक्रमाचे उपस्थित गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले़