रंगरुपांनी सजलेत बाप्पा..!

By Admin | Updated: September 5, 2016 00:46 IST2016-09-05T00:36:48+5:302016-09-05T00:46:15+5:30

जालना : इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूह, मैत्र मांदियाळी यासारख्या स्वयंसेवी संस्थांसह पोलिस प्रशासनानेही पुढाकार घेतला.

Bappa decorated with colors! | रंगरुपांनी सजलेत बाप्पा..!

रंगरुपांनी सजलेत बाप्पा..!


जालना : इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूह, मैत्र मांदियाळी यासारख्या स्वयंसेवी संस्थांसह पोलिस प्रशासनानेही पुढाकार घेतला. परिणामी लोकमतच्या उपक्रमातून तयार झालेल्या शाडूच्या एक हजार गणेशमूर्तींची त्या-त्या घरात प्रतिष्ठापणा आज होणार आहे.
पर्यावरणपूरक अर्थात इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची प्रतिष्ठापणा करून प्रदुषण टाळण्याचे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले होते. गत आठवडाभर शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याचे चांगले व दूरगामी परिणाम आगामी काळात दिसून येतीलच. यंदाचे हे पहिले वर्ष असून, पहिल्याच प्रयत्नात तब्बल एक हजार साठ मुलांनी निसर्ग बचावचा संदेश देत इकोफ्रेंडली गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. यामध्ये म.स्था. जैन विद्यालय १२० विद्यार्थी, राष्ट्रीय हिंदी विद्यालय २३० विद्यार्थी, शेलगाव येथील जिल्हा परिषद विद्यालय व जिजाऊ इंग्लिश स्कूलचे ७५ विद्यार्थी, उज्जैनपुरी येथील जिल्हा परिषद शाळेचे ७७ विद्यार्थी, जीवनराव पारे व विठ्ठल हायस्कूलमधील ६९ विद्यार्थी, रामचंद्र किनगावकर विद्यालयातील १०१ विद्यार्थी, पोदार इंग्लिश स्कूलचे ३०१ विद्यार्थी आणि अभिजात कोचिंग क्लासेसमधील ९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आजची मुले ही उद्याचे देशाचे भवितव्य आहे. पर्यावरण बचावचा नारा या मुलांच्या मनात पेरला गेला तरच उद्याची पर्यावरणाची संभाव्य हानी टळू शकेल आणि यामुळे मुलांमध्ये पर्यावरणाबाबत आपुलकी निर्माण होईल. लोकमतच्या या उपक्रमामुळे यंदा दहा शाळांमध्ये पर्यावरणाबाबतचा संदेश पोहोचला आहे. आगामी काळात ही व्यापक चळवळ होऊन प्लास्टर आॅफ पॅरीस हद्दपार होईल, हे मात्र निश्चित.

Web Title: Bappa decorated with colors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.