शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

बापरे... सांधेदुखीचे शंभरपेक्षा अधिक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:40 PM

वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूप येण्यापूर्वीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले.

ठळक मुद्देजागतिक संधिवात दिन : अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद

औरंगाबाद : वाढत्या वयासह जीवनशैलीतील बदल, लठ्ठपणा, फळभाज्यांच्या वाढीसाठी होणारा रासायनिक खतांचा वापर, पोषक आहाराचा अभाव, अशा अनेक कारणांनी सांधेदुखीचे प्रमाण वाढत आहे. सातत्याने सांधे दुखणे ही संधिवाताची सुरुवात असू शकते. सांधेदुखीचे शंभरापेक्षा अधिक प्रकार आहेत. त्यामुळे गंभीर स्वरूप येण्यापूर्वीच खबरदारी घेण्याची गरज असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात म्हणाले.संधिवाताबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा करण्यात येतो. चालण्याची दुरावलेली सवय, वाढते वजन, कमी होत चाललेल्या शारीरिक हालचाली, यामुळे भारतात संधीवाताचे प्रमाण वाढत आहे. जागतिक संधिवात दिनानिमित्त सांधेदुखीविषयी डॉ. चंद्रकांत थोरात यांच्याशी संवाद साधण्यात आला. डॉ. थोरात म्हणाले, शरीरातील सांध्यांमधील होणाऱ्या आजारांना साधारणपणे सांधेदुखी असे म्हणतात. सांध्यातील दोन हाडांमध्ये कमीत कमी घर्षण व्हावे, यासाठी एक जाड गुळगुळीत कार्टिलेज आणि वंगणरुपी द्रव असते. वाढते वय, रोगप्रतिकारशक्तीतील बिघाड, लठ्ठपणा, अनुवंशिकता, जंतूसंसर्ग, बदलेली जीवनशैली, अशा विविध कारणांनी सांध्यातील वंगणास इजा होऊन हाडांतील घर्षण वाढते. परिणामी नसा घासून वेदना व सूज येते. सांधेदुखीची सुरुवात असल्यास वेदनांची तीव्रता वाढत जाते.सांधेदुखीच्या प्रकारांविषयी बोलताना डॉ. थोरात म्हणाले, याचे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत. वयोमानानुसार होणारा संधिवात, आमवात, रक्तातील युरिक अ‍ॅसिडच्या वाढत्या प्रमाणामुळे, जंतूसंसर्गामुळे सांधेदुखी, पाठीच्या मणक्यातील सांधेदुखी असे क ाही मुख्य प्रकार आहेत. यामध्ये वयोमानानुसार होणाºया संधिवाताचे सर्वाधिक प्रमाण आहे. वयाच्या ५० ते ६० वर्षांनंतर या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यात गुडघा, खुबा, मणका, हाताच्या बोटातील सांधे म्हणजे शरीरातील ज्या सांध्यावर अधिक भार असतो, ते बाधित होतात.वयाच्या विशीत मणक्याचा संधिवातमणक्यातील संधिवात हा संधिवाताचा प्रकार प्रामुख्याने पुरुषांमध्ये साधारण वयाच्या विशीत होत आहे. यात पाठीच्या मध्यभागातील मणक्यांच्या हालचालीत अखंडपणा येतो. तर पुरुषांच्या तुलनेत आमवाताचे प्रमाण महिलांमध्ये ३ ते ४ पटीने अधिक आहे. आमवाताचे नेमके कारण अजूनही अज्ञात आहे. संधिवातापासून दूर राहण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन आटोक्यात ठेवणे, बैठी जीवनशैली टाळणे, व्यसनांपासून दूर राहाणे, या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला पाहिजे, असे डॉ.थोरात म्हणाले.

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य