बँका बंदचा सर्वसामान्यांना त्रास, अनेकजण अनभिज्ञ
By Admin | Updated: September 13, 2015 00:08 IST2015-09-12T23:41:23+5:302015-09-13T00:08:39+5:30
बीड : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बँकानाही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटीचा निर्णय जाहीर झाला असून त्याची अंमलबजावणी होती.

बँका बंदचा सर्वसामान्यांना त्रास, अनेकजण अनभिज्ञ
बीड : शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बँकानाही दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटीचा निर्णय जाहीर झाला असून त्याची अंमलबजावणी होती. याची माहिती अनेकांना नसल्यामुळे ते नेहमी प्रमाणे शनिवारी बँकेत गेले मात्र बँका बंद असल्याचे पहात नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
दुसऱ्या व चौथ्या शनिवारच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा हा पहिलाच दिवस होता. सदरील निर्णयापुर्वी, प्रत्येक शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँका अर्धा दिवस खुल्या असत. कर्मचाऱ्यांवर कामाचा त्राण अधिक वाढत आहे. त्यांना थोडासा दिलासा मिळावा तसेच त्यांच्यामध्ये नियमीत काम करण्याचा उत्साह अधिक वाढावा या उद्देशाने गेल्या अनेक वर्षापासून बँक असोसिएशनची ही मागणी होती. ती काही दिवसापुर्वीच मंजुर झाली आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांना कामातून काहिसा दिलासा मिळत आहे. ही बाब स्वागतार्हाय असली तर सर्व सामान्यांचे पैशाचे व्यवहार शनिवारी करता येणार नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत असल्याची प्रतिक्रीया सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे यांनी दिली. विशेष म्हणजे, दुसऱ्या व चौथ्या शनिवारी एनईफटी/आरटीजीएस अशा प्रकारचे आॅनलाईन व्यवहारही करता येणार नसल्याची माहिती एका बँक अधिकाऱ्याने दिली.
महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या शनिवारीच हे व्यवहार करता येतील असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. काही बँका एनईफटी/आरटीजीएसचे व्यवहार शनिवारी करुन ते सोमवारच्या कामकामाज दाखविण्याची तयारी केली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)