बँकांनी जिल्ह्यात कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:49 IST2017-09-16T00:49:37+5:302017-09-16T00:49:37+5:30
जिल्ह्यामध्ये कॅशलेस व्यवहारावर बँकांनी प्रचार प्रसार करुन जिल्ह्यात रोखरहित व्यवहारांचे प्रमाण वाढवावे, असे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी आयोजित बँक अधिकाºयांच्या जिल्हास्तरीय बैठकीत दिले.

बँकांनी जिल्ह्यात कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यामध्ये कॅशलेस व्यवहारावर बँकांनी प्रचार प्रसार करुन जिल्ह्यात रोखरहित व्यवहारांचे प्रमाण वाढवावे, असे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी आयोजित बँक अधिकाºयांच्या जिल्हास्तरीय बैठकीत दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाºयांची जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे रिजनल मॅनेजर बी.के. कौरी, नाबार्ड बँकेचे विकास अधिकारी प्रितम जंगम, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी राम खरटमल आदींसह सर्व बँकांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी बँकांच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच कर्जमाफीच्या या योजनेतून एकही थकबाकीदार व पात्र शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घ्यावी व शासनाकडून मागविण्यात आलेली माहिती वेळेत सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांचा बी.के.कौरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीस जिल्ह्यातील बँक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.