‘संग्राम’मध्येच बँका !

By Admin | Updated: August 3, 2014 01:16 IST2014-08-03T00:35:11+5:302014-08-03T01:16:26+5:30

बीड : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत आता ग्रामपंचायतींमध्येख बँकींग सुविधाही उपलब्ध झाली आहे. जि

Banks in the 'Sangram'! | ‘संग्राम’मध्येच बँका !

‘संग्राम’मध्येच बँका !


बीड : संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र योजनेंतर्गत आता ग्रामपंचायतींमध्येख बँकींग सुविधाही उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायतींमधून हा प्रयोग राबविण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे बँकेसाठी शहर, तालुके व मोठ्या गावांचे हेलपाटे तर वाचणारच आहेत शिवाय ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन व विविध शासकीय अनुदान मिळणेही सुकर होईल.
जिल्ह्यात एकूण १०२४ ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष उघडण्यात आला आहे. या कक्षातून १८ प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. ग्रामीण जनतेला बँकींग सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी संग्राममधूनच ही सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला.
मिनी बँकात मिळणाऱ्या सुविधा
मिनी बँका थेट राष्ट्रीयीकृत बँकांना जोडलेल्या असतील. यातून पैसे पाठविणे, पैसे जमा करणे, कर्जप्रकरण, धनाकर्ष काढणे आदी कामे केली जातात. शासनाकडून येणारे विविध अनुदानही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा सेविका, ग्रामरोगार सेवक, अंगणवाडी सेविका यांचे वेतनही यापुढे या बँकांमध्येच जमा होईल. त्यामुळे ग्रामस्थांचे बँकांतील हेलपाटे थांबतील, असे सामान्य प्रशासन विभागातील सांयिकी विस्तार अधिकारी चंद्रकांत पांडव म्हणाले़
येथे सुरु आहेत मिनी बँका
शिरुर तालुक्यातील घाटशिळ पारगाव, राक्षसभुवन, कान्होबाचीवाडी, घोगस पारगाव, लिंबा, पौंडूळ, आर्वी परळी तालुक्यातील दाऊदपूर, बेलंबा, बोधेगाव, नांदडी, नाथ्रा, कौठळी, नंदणज, कासारवाडी, पाटोदा तालुक्यातील मुगगाव, पारनेर, तळे पिंपळगाव, पिंपळगाव धस, गवळवाडी आष्टी तालुक्यातील चिंचपूर, आष्टा, मातकूळी, पोखरी, शेरी (खू.), हनुमंतगाव, साबलखेड, गंगादेवी, सावरगाव घाट या गावात सुविधा उपलब्ध आहे.
आॅपरेटर्सना प्रशिक्षण
संग्राम कक्षांतर्गत सुरु केलेल्या बँकींग सुविधेसाठी आॅपरेटर्सना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले गेले. उर्वरित आॅपरेटर्सनाही टप्प्याटप्प्याने प्रशिक्षित केले जाईल, असे संग्रामचे जिल्हा समन्वयक प्रदीप जोगदंड यांनी सांगितले. गाव ज्या राष्ट्रीय बँकेकडे दत्तक आहे, त्या बँकेची उपशाखा कार्यान्वित केली जाते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Banks in the 'Sangram'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.