कर्ज वसुलीला स्थगिती असताना कर्जदारांना बँकांच्या नोटिसा !
By Admin | Updated: December 22, 2014 01:01 IST2014-12-22T00:54:22+5:302014-12-22T01:01:25+5:30
लातूर/मसलगा : जिल्ह्यात अंतिम पिकाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असून, दुष्काळ सदृष्यस्थिती आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे़

कर्ज वसुलीला स्थगिती असताना कर्जदारांना बँकांच्या नोटिसा !
लातूर/मसलगा : जिल्ह्यात अंतिम पिकाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी असून, दुष्काळ सदृष्यस्थिती आहे़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे़ मात्र काही बँकांनी कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविणे सुरुच ठेवले आहे़ निलंगा तालुक्यातील निटूर येथील भारतीय स्टेट बँकेने मसलग्याच्या एका शेतकऱ्याला अशीच नोटीस पाठविली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी कर्ज वसुलीला स्थगिती दिल्यानंतर लातूर तालुक्यातील भिसेवाघोली येथील शेतकऱ्यास बँकेची नोटीस आली़ या कर्जासाठी तसेच अन्य कर्ज कसे फेडावे या विवंचनेने तेथील शेतकऱ्याने आत्महत्याही केली़ हे उदाहरण ताजे असताना भारतीय स्टेट बँकेच्या निटूर शाखेने मसलगा येथील वयोवृद्ध शेतकरी नसरुद्दीन फतरुसाब शेख या शेतकऱ्यास २००६ साली घेतलेल्या पीक कर्जासंदर्भात नोटीस पाठविली आहे़ २००७ मध्ये शासनाने कर्जमाफ केले होते़ परंतु तुमची चालू बाकी नसल्यामुळे तुम्हाला कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे, असे म्हणून २००६ च्या पीक कर्जासंदर्भात वसुलीची नोटीस या शेतकऱ्यास पाठविण्यात आली आहे़ परवाच जिल्हाधिकाऱ्यांनी बँकर्स समितीच्या बैठकीत कर्ज वसुली करु नये, शेतकऱ्यांना वसुलीसंदर्भात तगादा लावू नये, असे सक्त निर्देश दिले आहेत़ तरीही अशा नोटीसा येत आहेत़ (प्रतिनिधी)