बँक फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: February 2, 2016 00:29 IST2016-02-01T23:45:47+5:302016-02-02T00:29:05+5:30
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला.

बँक फोडण्याचा प्रयत्न
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरात असलेल्या स्टेट बँक आॅफ हैद्राबाद शाखेतील स्ट्राँग रूम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. तिघाजणांनी हा प्रयत्न करूनही यश न आल्याने निराश हाताने चोरटे निघून गेले. हा प्रकार शुक्रवारी पहाटे घडला.
अज्ञात तीन चोरट्यांनी बँकेचे मुख्य चॅनल गेट सोडून बँकेत प्रवेश केला. स्टोअर रूम फोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, हाती काहीच न लागल्याने चोरटे निघून गेले. सकार्ळी शाखा उघडी दिसल्याची आरडाओरड झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी कर्मचारी पौर्णिमा राजू सावंत यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तपास फौजदार जनार्धन खंडेराव करीत आहेत. (वार्ताहर)