बँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: October 3, 2016 00:33 IST2016-10-03T00:31:28+5:302016-10-03T00:33:26+5:30

औरंगाबाद : आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी क्रांतीचौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

Bank employees' agitation | बँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

बँक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

औरंगाबाद : आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि आॅल इंडिया बँक आॅफिसर्स असोसिएशनच्या वतीने रविवारी क्रांतीचौकात धरणे आंदोलन करण्यात आले.
हेतूत: बँकेचे कर्ज थकविणे हा फौजदारी गुन्हा ठरवा, कर्ज बुडव्यांना निवडणुकीस अपात्र ठरवावे, वसुलीसाठी बँकांना जादा अधिकार द्यावे, सहयोगी बँकांचा स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव रद्दबातल करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
विविध बँकांच्या सुमारे चारशेवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांत महिला कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. नागराजन्, जगदीश भावठाणकर, देवीदास तुळजापूरकर, राकेश बुरबुरे, रवी धामणगावकर, राजीव ताम्हाणे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. सुटीच्या दिवशी कर्णपुऱ्यात जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष या आंदोलनाने वेधून घेतले होते.

Web Title: Bank employees' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.