अनुदानासाठी फेकल्या बांगड्या!
By Admin | Updated: December 14, 2015 23:57 IST2015-12-14T23:52:36+5:302015-12-14T23:57:24+5:30
बीड : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मागील सहा महिन्यांपासून निराधारांचे अनुदान मंजुरीचे प्रस्ताव बैठक न झाल्याने पडून आहेत

अनुदानासाठी फेकल्या बांगड्या!
बीड : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. मागील सहा महिन्यांपासून निराधारांचे अनुदान मंजुरीचे प्रस्ताव बैठक न झाल्याने पडून आहेत. या विरोधात संजय गांधी अनुदान समितीचे माजी अध्यक्ष दिलीप भोसले यांच्या नेत्तृत्वाखाली सोमवारी निराधार महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बांगड्या फेकून प्रशासनावरील रोष व्यक्त केला.
मागील वर्षभरात तहसील कार्यालयात एकही बैठक न झाल्याने निराधारांच्या अनुदानाचे प्रस्ताव धुळखात पडून आहेत. एकीकडे जिल्हयात तीव्र दुष्काळ आहे तर दुसरीकडे निराधारांना अनुदान मिळत नसल्याने बांगडी फेको मोर्चा सोमवारी काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निराधारांचे अनुदान महागाई नुसार ६०० वरून १५०० रूपये करावे, राष्ट्रीय अर्थ कुटूंब सहाय्यासाठी दारिद्र्य रेषेची अट रद्द करून २० हजारावरून अर्थ कुटुंब सहाय्य १ लाख रूपये द्यावे. या मागणीसह विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
याप्रसंगी निराधार महिलांनी केलेल्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणूण गेला होता. मोर्चा दरम्यान नगर रोड वर दोन तास वाहतून ठप्प झाली होती. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप भोसले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक हिंगे, यांच्यासह हजारो महिलांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)