लातूरच्या फुलबाजारात ‘ड्रॅगन’ची घूसखोरी..!

By Admin | Updated: January 5, 2016 00:09 IST2016-01-04T23:32:08+5:302016-01-05T00:09:59+5:30

राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्ह्यातील फुलबाजारात आता चिनी बनावटीच्या फुलांची वाढती घुसखोरी फुलशेती घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक डोकेदुखी ठरली आहे. दिर्घायूषी चिनी फुलांची वाढती

'Bang Bang' in Latur's flower market! | लातूरच्या फुलबाजारात ‘ड्रॅगन’ची घूसखोरी..!

लातूरच्या फुलबाजारात ‘ड्रॅगन’ची घूसखोरी..!


राजकुमार जोंधळे , लातूर
शहरासह जिल्ह्यातील फुलबाजारात आता चिनी बनावटीच्या फुलांची वाढती घुसखोरी फुलशेती घेणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक डोकेदुखी ठरली आहे. दिर्घायूषी चिनी फुलांची वाढती मागणी या फुलबाजारात पहायला मिळत आहे. परिणामी, लातूर जिल्ह्यातील भविष्यातील फुलशेतीच ‘ड्रॅगन’च्या घुसखोरीने उध्द्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
लातूर शहरासह जिल्ह्यात १६६ फ्लॉवर स्टॉल आहेत. यातील लातूर शहरात २५, उदगीर १५, निलंगा १५, शिरुर अनंतपाळ ५, चाकूर ८, नळेगाव ४, देवणी ५, जळकोट ६, अहमदपूर १५, मुरुड ८, शिरुर ताजबंद ५, हाडोळती ३, औराद शहाजानी ६, रेणापूर ८, किनगाव ५, वाढवणा ५, हाळी-हंडरगुळी ८, वलांडी ५, औसा १५ आदी ठिकाणी जिल्हाभरात १६६ लोकांनी फुलव्यवसाय थाटला आहे. शहरी भागात विविध फुलांची मागणी असून, खेड्यासह ग्रामीण भागात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. गुलाब, शेवंती, झेंडू, जरबेरा आणि इतर विविध जातींच्या फुलांना बाजारात मागणी आहे. मात्र अलिकडे चिनी बनावटींच्या फुलांच्या घुसखोरीने अनेक फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
लाखो रुपयांचे पॉलिहाऊस उभारुन फुलशेती शेतकरी फुलवित आहेत. पण ड्रॅगनच्या घुसखोरीमुळे जिल्ह्यातील फुलशेतीच धोक्यात आली आहे.
शिवाय, वर्षभरात चार वेळा जरबेरा फुलांची शेती घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम जाणवू लागला आहे. ग्राहकांना केवळ काही क्षणासाठी या फुलांच्या गुच्छांची, हार-तुऱ्यांची गरज असते. विशेष म्हणजे चिनी बनावटींच्या फुलांमुळे देणाऱ्याला त्यातून घराची सजावटही करता येते. या फुलांचे आयुष्य दीर्घ असल्यानेच या फुलांच्या मागणीत वाढ होते आहे.

Web Title: 'Bang Bang' in Latur's flower market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.