शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका होईपर्यंत उपोषण, मोर्चे, आंदोलनांवर बंदी; जाणून घ्या आचारसंहितेतील निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:18 IST

शासकीय इमारत परिसर प्रचारासाठी वापरण्यावर बंधने

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका होईपर्यंत शासकीय कार्यालय परिसरात आंदोलन करण्यास निर्बंध लावले आहेत.

निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार या सर्व कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चे, निदर्शने, घेराव आदी आंदोलने केल्यास फौजदार प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ अन्वये कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत, राजकीय पक्षांना आचारसंहितेची माहिती देण्यात आली.

आचारसंहितेत कशावर आहेत निर्बंध- प्रचारासाठी कोणत्याही खासगी जागा, इमारती, आवार, भिंतीचा वापर संबंधित मालकाच्या परवानगीविना व प्राधिकरणाच्या परवानगीविना वापर करता येणार नाही.- प्रचारादरम्यान नमुना मतपत्रिका छापून ती मतदारांमध्ये वाटप करता येणार नाही.- संबंधित पोलिसांच्या परवानगीविना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी ६:०० वाजण्यापूर्वी व रात्री १०:०० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपक लावता येणार नाही.- प्रचारादरम्यान पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट, कटआऊट, पेंटिंग, होर्डिंग, कमानींमुळे रहदारीस अडथळा झाल्यास कारवाई होईल.- जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विश्रामगृहांच्या इमारती, आवार व परिसराचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही.- उमेदवारी अर्ज दाखल करताना पाचपेक्षा जास्त व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात नसाव्यात. - कार्यालय परिसरात मिरवणूक काढणे, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे इत्यादी प्रकारे प्रचार करण्यावर बंदी असेल. - निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास, वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. - परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर लावता येणार नाहीत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादElectionनिवडणूक