शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांचे निलंबन, बडतर्फीपूर्वी विद्यापीठाची परवानगी बंधनकारक होणार 

By राम शिनगारे | Updated: December 6, 2023 13:58 IST

नागपूर, अमरावती विद्यापीठाप्रमाणे परिनियम तयार होणार; परवानगी असेल तर निलंबन काळातील पगाराचा प्रश्न सुटणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांवर निलंबन, बडतर्फ करण्याची कारवाई करण्यापूर्वी संस्था चालकांना विद्यापीठांची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासन नवीन नियम तयार करणार आहे. नागपूर, अमरावती विद्यापीठाच्या धर्तीवर हा निर्णय होणार आहे. याविषयीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या अधिसभेच्या बैठकीत सदस्य डॉ. विक्रम खिलारे यांनी मांडला होता. तो एकमुखाने मंजूर करण्यात आला.

नागपूर, अमरावती येथील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या निलंबनापूर्वी विद्यापीठाची परवानगी घेण्याविषयीचे परिनियम (स्टॅट्यूट) आहेत. त्याशिवाय उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी २६ एप्रिल २०२३ रोजी सर्व विभागीय सहसंचालकांना पत्र पाठविले. त्यानुसार सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी २७ एप्रिल २०२३ रोजी सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेण्याच्या सूचना केल्या. नागपूर, अमरावती विद्यापीठातील परिनियम, शिक्षण संचालक, सहसंचालकांच्या पत्रांच्या आधारे आणि विद्यापीठ कायद्याच्या तरतुदींचा आधार घेत डॉ. विक्रम खिलारे यांनी अधिसभेच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला होता. 

हा प्रस्ताव चर्चेला आल्यानंतर त्यास अधिसभा सदस्य डॉ. मुंजा धोंडगे, प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. संजय कांबळे यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार हा प्रस्ताव एकमुखाने अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे. त्याच वेळी हा प्रस्ताव संस्था चालक, प्राचार्य व प्राध्यापकांच्या हिताचा असल्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही त्यास एकमुखाने मंजुरी देण्याचे आश्वासन बैठकीतच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अंकुशराव कदम, डॉ. रविकिरण सावंत, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, डॉ. गौतम पाटील, डॉ. योगीता होके-पाटील यांनी देऊन सभागृहात आश्वासित केले. त्यामुळे अधिसभेत मंजूर झालेल्या ठरावास व्यवस्थापन परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर प्राध्यापकांच्या निलंबनापूर्वी विद्यापीठाची परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे.

संस्था चालक, प्राध्यापकांना होणार फायदाअधिसभेच्या बैठकीतच संस्था चालक, प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या हिताचा हा क्रांतिकारी निर्णय आपल्या कारकीर्दीत या अधिसभेने घेतला, याचा आनंद असल्याचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ठराव मंजूर करताना सांगितले. या निर्णयाचा संस्था चालकांनाही फायदा होईल. जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही संस्था चालकांनी परवानगी न घेताच प्राध्यापकांना निलंबित केले. त्यांच्या वेतनाचे लाखो रुपये संस्था चालकांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे पूर्वपरवानगी घेतल्यानंतर संस्था चालकांना लाखाे रुपये देण्याची गरज भासणार नाही. तसेच प्राध्यापकांचेही उठसूट निलंबन करता येणार नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducationशिक्षण