शहरं
Join us  
Trending Stories
1
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
4
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
5
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
6
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
7
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
8
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
9
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
10
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
11
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
12
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
13
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
14
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
15
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
16
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता
17
धक्कादायक! अंकिता भंडारीचा खुनी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतरही हसत राहिला, फोटोसाठी पोजही दिली
18
Video : खेळणं समजून किंग कोब्राशी खेळत बसला चिमुकला! पुढे जे घडतंय ते बघून तुम्हालाही होईल धाकधूक
19
स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार 'क्योंकि सास भी कभी...'चे शूट; लोकांचे फोन होणार टॅप?
20
गुजरात टायटन्सला लागली लॉटरी; एलिमिनेटर सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अर्धा संघा 'आउट'

‘नॅक’ मूल्यांकनास मुदतवाढ मिळाली; आता प्रवेशासाठी ५०० रुपयांच्या बाँडवर हमी द्या: विद्यापीठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:22 IST

शासनाने ‘नॅक’ मूल्यांकनास मुदतवाढ दिल्यामुळे निर्णय

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘नॅक’ मूल्यांकन न केलेल्या २३३ महाविद्यालयांना प्रवेशबंदी केली होती. मात्र, शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या आदेशामुळे विद्यापीठ प्रशासन बॅकफूटवर आले आहे. सहा महिन्यांत ‘नॅक’ मूल्यांकनाची ५०० रुपयांच्या बाँडवर हमी दिल्यानंतरच संबंधित महाविद्यालयांचे प्रवेश पूर्ववत करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यानुसारच संलग्न प्रत्येक महाविद्यालयांना ‘नॅक’ मूल्यांकन करणे बंधनकारक आहे. त्याविषयी विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय घेतला. त्याविषयीच्या सूचनाही महाविद्यालयांना दिल्या. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी १७ मे रोजी २३३ महाविद्यालयांतील प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शिक्षण संस्थाचालकांचे धाबे दणाणले होते. निर्णय मागे घेण्यासाठी विद्यापीठ प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न काही संस्थाचालकांनी केला.

६ महीने मुदतवाढ, ५०० रुपयांच्या मुद्रांकावर हमीमात्र, विद्यापीठ पातळीवर दिलासा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे हा चेंडू उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोर्टात नेण्यात आला. त्याठिकाणी मागील सहा महिन्यांपासून ‘नॅक’चे संकेतस्थळ बंद असल्यामुळे मूल्यांकन करता आले नाही. त्याचा फटका महाविद्यालयांना बसला. आता प्रवेशबंदी केल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मुद्दा गंभीर होऊ शकतो, असे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांनी ‘नॅक’ मूल्यांकनास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला केलेल्या कारवाईतून माघार घ्यावी लागली. आता विद्यापीठाने प्रवेशासाठी बंदी घातलेल्या महाविद्यालयांना आगामी सहा महिन्यांत ‘नॅक’ मूल्यांकन करण्याची हमी ५०० रुपयांच्या मुद्रांकावर द्यावी लागेल. त्यानंतरच प्रवेश पूर्ववत होणार असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.

कोहिनूर महाविद्यालयावर प्रशासक?काही महिन्यांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाची डॉ. भालचंद्र वायकर समितीने चौकशी केली होती. या समितीच्या अहवालाच्या आधारे महाविद्यालयावर कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत कोहिनूरचा विषय ठेवला आहे. त्यात प्रशासक नेमण्याची कारवाई होऊ शकते.

एका सदस्यास नोटीस?विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या एका सदस्यास कुलपती कार्यालयाने ‘सदस्यत्व का रद्द करण्यात येऊ नये’ अशी कारणे दाखवा नोटीस दिल्याची चर्चा आहे. त्यास कुलपती व कुलगुरू कार्यालयाकडून दुजोरा मिळू शकला नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय