बामणीमध्ये भरदुपारी चार घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2016 00:16 IST2016-02-09T23:58:28+5:302016-02-10T00:16:58+5:30

परतूर : तालुक्यातील बामणी गावात सोमवारी भरदुपारी चोरट्यांनी चार घरे फोडून जवळपास एक लाखांचा एवज लंपास केला. या प्रकाराने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे

In Bamni, the whole house washed four houses | बामणीमध्ये भरदुपारी चार घरे फोडली

बामणीमध्ये भरदुपारी चार घरे फोडली


परतूर : तालुक्यातील बामणी गावात सोमवारी भरदुपारी चोरट्यांनी चार घरे फोडून जवळपास एक लाखांचा एवज लंपास केला. या प्रकाराने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
परतूर शहरापासून चार पाच कि. मी. अंतरावर असलेल्या बामणी या गावात ८ फेब्रुवारी रोजी दुपरी ११ ते २ च्या दरम्यान चोरट्यांनी चार घरे फोडली. या गावात दुपारी भागवत कथा सुरू आहे. यामुळे दुपारी घरे बंद करून गावकरी कथा ऐकण्यास जातात. या संधीचा फायदा घेवून चोरटयांनी संतोष आसाराम वटाने यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख २० हजार रू. असा एकूण ५४ हजारांचा एवज लंपास केला. पार्वतीबाई औटे यांच्या किराणा दुकानातील सामान व काही नगदी पैसे, नवनाथ खालापूरे यांच्या घरातून काही वस्तू व पैसे, भाउसाहेब खालापूरे यांच्या घरातून साड्या व काही रोख रक्कम अज्ञात चोरटंयानी लंपास केली, असा एकूण जवळपास एक लाखाचा एवज चोरीस गेला असल्याचे सांगितल्या जाते. मागील आठवडयातही या गावात दोन ते तीन ठिकाणी चोरी झाल्याचे गावक ऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
भरदुपारी चार घरे फोडल्याने ग्रामिण भागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संतोष वटाने यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक के. के. शेख हे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: In Bamni, the whole house washed four houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.