शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

बळीराजा पेरता झाला; मराठवाड्यात आतापर्यंत ३ टक्के क्षेत्रावर पेरणी, सोयाबीनला पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 19:40 IST

मराठवाड्यात खरीप हंगामात तब्बल ४९ लाख ७३ हजार ७२ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची पेरणी करतात. आतापर्यंत १.४९ लाख हेक्टरवर पेरणी 

छत्रपती संभाजीनगर : मृग नक्षत्राचे पहिले आठ दिवस कोरडे गेल्यानंतर मराठवाड्यात पावसाला बऱ्यापैकी सुरुवात झाली अन् बळीराजा पेरता झाला. मागील आठ दिवसांत मराठवाड्यात एक लाख ४९ हजार ५०९ हेक्टरवर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी झाली. मराठवाड्यातील खरीप हंगामातील पेरणीयोग्य एकूण क्षेत्राच्या २.३० टक्के क्षेत्रावर ही पेरणी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

मे महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना या कालावधीत शेतीच्या मशागतीची कामे करता आली नव्हती. मे मधील पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी मशागतीच्या कामाला लागले. मराठवाड्यात खरीप हंगामात तब्बल ४९ लाख ७३ हजार ७२ हेक्टर क्षेत्रावर शेतकरी विविध प्रकारच्या पिकांची पेरणी करतात. यात सर्वाधिक २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर क्षेत्र साेयाबीनचे आहे. आतापर्यंत ६७ हजार ५३९ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती कापसाला आहे. मराठवाड्यात सरासरी १४ लाख ७९ हजार ५३५ हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. कालपर्यंत १ लाख २९ हजार ८२७ हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली. नगदी पीक म्हणून मका पिकाची शेतकरी निवड करतात. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत सुमारे अडीच लाख हेक्टरवर मका लागवड होते. यावर्षी आतापर्यंत मक्याची सरासरी पेरणी केवळ ३ टक्के झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून तूर लागवड वाढत आहे. यंदा सुमारे साडेचार लाख हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड होईल असा अंदाज कृषी विभागाने नोंदवला आहे. तुरीला आंतरपीक म्हणूनही शेतकरी पसंती देतात.

जिल्हा----------- खरीप हंगामाचे क्षेत्र हेक्टरमध्ये------ आजपर्यंतचे पेरणी क्षेत्रछ. संभाजीनगर--६,८१ ९०३---२१०३३जालना-- ६,५११७३ ------२१७४८बीड--- ८,०८९४५ ------४८८५लातूर-- ५,८६१०१--- ७२९२धाराशिव-- ५,५४१६०--- ७२५९७नांदेड---७,६१५७६--- ११६४परभणी--- ५,१८४६८--- ११३८४हिंगोली-- ४,१०३९८--- ४०६सरासरी एकूण क्षेत्र ४९,६२७२७ हेक्टरप्रत्यक्ष पेरणी -- १४९५०९ हेक्टरप्रत्यक्ष पेरणीची टक्केवारी- २.३०

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस