शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

‘बळीराजा दे वचन आम्हास...’; लाडक्या 'संजा' बैलास श्रद्धांजली, शेतकऱ्यांस केले आवाहन 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 15, 2023 16:37 IST

डीजेच्या तालावर सर्जा-राजासमोर नाचले गावकरी

छत्रपती संभाजीनगर : ‘मानाची जोडी पोळ्यात भारी’, ‘मान बैलाचा सण पोळ्याचा’, ‘नाद एकच बैलगाडा शर्यत’, असे गाणे डीजेवर वाजत होते आणि सजविलेल्या ‘सर्जा-राजा’समोर चिकलठाणकर नृत्य करत होते. हे दृश्य बघण्यासाठी हजारो गावकरी जमले होते तर एसटी बस, कंपन्यांच्या बसमधून जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांनादेखील या बैलजोड्यांच्या मिरवणुकीला आपल्या मोबाइलमध्ये बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही.वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलजोडीच्या श्रमाचा गौरव करणारा ‘पोळा’ सण गुरूवारी सर्वत्र साजरा करण्यात आला. शहरात मातीचे, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बैल जोडी खरेदी करून घरोघरी पुजले गेले. तर ग्रामीण बाज टिकून ठेवलेल्या चिकलठाण्यात गुरूवारी पोळ्याचा मोठा उत्साह होता.

येथील चौधरी कॉलनीच्या मैदानात परिसरातील ३८ बैलजोड्यांना आणण्यात आले होते. आकर्षकपणे त्यांना सजविण्यात आले होते. काहींच्या शिंगावर देवदेवतांचे फोटो लावण्यात आले होते. वाघ्या मुरळीच्या गाण्यावर नागरिक नृत्य करत होते तर कोणी डीजेच्या ठेक्यावर नृत्य करत होते. चिकलठाणाच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक पुढे-पुढे सरकत होती. तसतशी बघणाऱ्यांची गर्दी वाढत होती. वाजत-गाजत बैलजोड्यांना हनुमान चौक येथील पावन हनुमान मंदिराच्या दरवाजासमोर नेण्यात आले. तिथे पायरीवर बैलांना डोके टेकवून त्यांना घरी नेण्यात आले. दुपारी ३:३० वाजता सुरू झालेला उत्साह रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होता. लम्पीच्या रोगामुळे सरकारने मिरवणूक न काढण्याच्या आवाहनाला हर्सूलकरांनी प्रतिसाद देत मोठी मिरवूणक काढणे टाळले.

‘दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा’चिकलठाण्यात एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘घरचा साज... संजा यास भावपूर्ण श्रद्धांजली’ असे छापण्यात आले होते. मरण पावलेल्या ‘संजा’ नावाच्या बैलाचा फोटोही त्याच्या मालकाने पोस्टरवर छापून श्रद्धांजली वाहिली होती. तसेच ‘नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा, दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा’ या ओळीही वाचून अनेकांचे मन भरून येत होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी