बालगृह सौर दिव्यांनी झगमगले
By Admin | Updated: September 11, 2014 00:36 IST2014-09-11T00:26:51+5:302014-09-11T00:36:17+5:30
जालना : येथील स्वामी विवेकानंद मुलींचे बालगृहास लॉयन्स क्लब आॅफ जालना रॉयल्सतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सौर दिवे बसविण्यात आले.

बालगृह सौर दिव्यांनी झगमगले
जालना : येथील स्वामी विवेकानंद मुलींचे बालगृहास लॉयन्स क्लब आॅफ जालना रॉयल्सतर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून सौर दिवे बसविण्यात आले.
पाच सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात गायत्री विद्यालयाचे ओमप्रकाश धानवाला, प्रतिभा श्रीपत (जैन विद्यालय) व सरस्वती भुवनचे प्रदीप भावठाणकर या शिक्षकांचा क्लब तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष शिवकुामर बैजल होते. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्कारमूर्ती गुरुजनांच्या हस्ते सौर दिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. भारनियमनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नव्हते, या सौर दिव्यांमुळे ही अडचण निश्चितपणे दूर झाली असे प्रतिपादन संस्थेचे अधीक्षक अविनाश नलगिरे यांनी केले. क्लबतर्फे देण्यात आलेल्या सौर दिवे व सहा मॅटिंग (बिछाईत) दिल्याबद्दल त्यांनी लॉयन्स क्लब जालना रॉयल्सचे आभार मानले. सत्कारास उत्तर देतांना धानवाला, भावठाणकर, श्रीपत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. भाला, रेखा बैजल, मीनाक्षी सोनी यांनी गुरुजणांचा परिचय करुन दिला. ससंथेच्या मुलींनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. सूत्रसंचलन रेखा बैजल यांनी तर आभार प्रदर्शन सचिव कांतीलाल राठी यांनी केले. क्लबचे सदस्य विनोदभाई शाह, कश्मिरीलाल अग्रवाल, सत्यनारायण तोतला, ब्रिजमोहन लढ्ढा, सुभाष गादिया, मंत्री, सोनी आदींची उपस्थिती होती.
लायन्स क्लब आॅफ जालना रॉयल्सच्या वतीने शहरात नियमित विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून हे कार्य केल्याचे क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सौर दिव्यांमुळे बालगृहाचा परिसर प्रकाशमय झाला असून, विद्यार्थ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)