बेकरी पदार्थ विक्रेत्याला मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:03 IST2021-04-08T04:03:56+5:302021-04-08T04:03:56+5:30
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार बाबाराव रामाराव शिंदे (रा. पेशवेनगर, सातारा परिसर) हे ५ एप्रिलला रात्री छावणी ...

बेकरी पदार्थ विक्रेत्याला मारहाण करून लुटले
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार बाबाराव रामाराव शिंदे (रा. पेशवेनगर, सातारा परिसर) हे ५ एप्रिलला रात्री छावणी येथील बेकरीतून ते ब्रेड, केक आणि अन्य पदार्थ घेऊन घरी जात होते. कॉलनीतील प्रल्हाद महाराज मंदिराजवळ त्यांना दुचाकीस्वार दोन अनोळखी व्यक्तींनी अडविले. यावेळी एकाने अचानक त्यांच्या खांद्यावर चाकूने ओरखडा मारून जखमी केले तर दुसऱ्याने त्यांच्या खिशातील नऊ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. यावेळी त्यांना धमकावत आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. या घटनेविषयी शिंदे यांनी सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली.
====
जावयाला सासुरवाडीत मारहाण
औरंगाबाद : जुन्या वादातून जावई कैलास दादाराव भालेराव (वय ३३, रा. नारेगाव) यांना सुधाकरनगर येथे सासुरवाडीत साला आणि अन्य नातेवाइकांनी दांड्याने मारहाण करून जखमी केले. याविषयी भालेराव यांनी आरोपी सुनील वामनराव अरसुड, चंद्रकांत बदामराव अरसुड आणि महिलेविरुद्ध सातारा ठाण्यात तक्रार नोंदविली. पत्नीसह सासुरवाडीत गेल्यावर ५ एप्रिलला ही घटना झाली.
====
उघड्या घरातून दोन मोबाईल पळविले
औरंगाबाद : उकाड्यामुळे घराचे दार उघडे ठेवून झोपणे एकजणाला चांगलेच महागात पडले. चोरट्यांनी तक्रारदार महेश मलिकार्जुन गोरे (वय २७, रा. हनुमाननगर ) यांच्या घरातून दोन मोबाईल ६ एप्रिलच्या रात्री चोरून नेले. ही घटना समोर येताच गोरे यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली.
=========
छावणी टपाल कार्यालय परिसरातील चंदन झाडाची चोरी
औरंगाबाद : शहरात सुरू असलेल्या चंदन चोरीच्या शृंखला खंडित करण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहेत. छावणीतील पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालय परिसरातील सुमारे १५ हजारांचे चंदनाचे झाड तस्करांनी कापून नेले. ही घटना ३ मार्चला रात्री झाली. लिपिक नीळकंठ श्रीकृष्ण इश्वरे यांनी याविषयी छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.