बजाजनगरात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 21:41 IST2019-05-14T21:41:01+5:302019-05-14T21:41:13+5:30
वाळूज महानगर: बजाजनगराच्या स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासन कानाडोळा करित असल्याने मुख्य रस्त्यावरील चौका- चौकात अस्वच्छता पसरली आहे. वेळेवर साफसफाई करुन ...

बजाजनगरात अस्वच्छता
वाळूज महानगर: बजाजनगराच्या स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासन कानाडोळा करित असल्याने मुख्य रस्त्यावरील चौका- चौकात अस्वच्छता पसरली आहे.
वेळेवर साफसफाई करुन कचरा उचलला जात नसल्याने येथील त्रिमुर्ती चौक, शिवाजी चौक, कोलगेट चौक, महाराणा प्रताप चौक, इंद्रप्रस्थ कॉलनी, जयभवानी चौक रस्ता, हनुमान मंदिर परिसर आदी ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कचरा जागेवरच सडत असल्याने परिसरातील रहिवाशांना दुर्गंधी व डासाचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने स्वच्छतेकडे लक्ष देवून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.