बजाज युनियनचा निकाल जाहीर
By Admin | Updated: November 8, 2016 01:28 IST2016-11-08T01:22:11+5:302016-11-08T01:28:28+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील बजाज आॅटो या कंपनीतील बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी पार पडली होती

बजाज युनियनचा निकाल जाहीर
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीतील बजाज आॅटो या कंपनीतील बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात रविवारी पार पडली होती. सोमवारी पहाटे मतमोजणी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी झालेल्या २७ कामगार प्रतिनिधींनी जल्लोष करीत पदाधिकाऱ्यांची यादी कंपनीकडे सादर केली.
बजाज आॅटो या कंपनीतील जवळपास २ हजार ७०० कामगार बजाज आॅटो एम्प्लॉईज युनियनचे सदस्य आहेत. दर साडेतीन वर्षांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन कामगार प्रतिनिधींची निवड करण्यात येते. एकूण २७ जागांसाठी ८० कामगार सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी झालेल्या २७ कामगार प्रतिनिधींचे गुप्त मतदान घेऊन व्यवस्थापकीय कार्यकारिणी व शॉप प्रतिनिधींची निवड करण्यात आल्याचे भाऊसाहेब वाघमारे, प्रमोद फडणीस यांनी सांगितले.