शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रक्षकच निघाला चोर! बनावट सोन्यावर कर्ज; शाखा व्यवस्थापकाचा कंपनीला १२ लाखांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 19:42 IST

स्ट्राँग रूममध्ये निघाले बनावट सोने; ऑडिटमध्ये फुटले फसवणुकीचे भांडं, मॅनेजरवर गुन्हा

वाळूज महानगर : वाळूज येथील बजाज फायनान्सच्या गोल्ड लोन शाखेत धक्कादायक आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शाखा व्यवस्थापकाने बनावट सोने तारण ठेवून बनावट ग्राहकाच्या नावाने तब्बल ११.९० लाखांचे कर्ज मंजूर केले. कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे वित्तीय संस्थांमधील अंतर्गत नियंत्रण व पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

कन्हैयालाल किशोरलाल अहिर (वय ३५, एरिया मॅनेजर) यांच्या फिर्यादीनुसार, ते कंपनीत ऑडिट व शाखा निरीक्षणाचे काम पाहतात. दि. २ जानेवारी रोजी रिजनल मॅनेजर महेश वीर यांनी बजाजनगर शाखेतील समस्या लक्षात घेऊन तातडीने भेट देण्याच्या सूचना दिल्या. यानुसार अहिर हे त्याच दिवशी सायंकाळी शाखेत पोहोचले असता, शाखा व्यवस्थापक सदाशिव मुरलीधर डोईफोडे हे चार ते पाच दिवसांपासून अनुपस्थित असल्याचे आणि त्यांचा मोबाइल बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी ऑडिटर सुनील भालेराव यांनी शाखेचे ऑडिट सुरू केले. ऑडिटदरम्यान ग्राहकांनी तारण ठेवलेले सोने स्ट्राँग रूममधून काढून तपासणी करण्यात आली. त्यावेळी एका गोल्ड पाउचबाबत संशय निर्माण झाला. पुढील पडताळणीत त्या पाउचमध्ये बनावट सोने असल्याचे स्पष्ट झाले. तसेच वजनातही फेरफार आढळून आला.

रक्षकच निघाला चोर, तपास सुरूतपासात पुढे असे उघड झाले की, सदाशिव डोईफोडे यांनी दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी एका व्यक्तीकडून हे सोने स्वीकारले होते. त्यांनी स्वतःच त्याची पडताळणी करून ते खरे असल्याचे दाखवले आणि सहकारी कर्मचारी निकिता जैस्वाल यांची सही घेऊन ते स्ट्रॉंग रूममध्ये ठेवले. यानंतर आरोपीने राजकुमार खंदारे या नावाने बनावट ग्राहक तयार करून त्या बनावट सोन्यावर गोल्ड लोन मंजूर केले. या प्रक्रियेतून एकूण ११ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज काढून कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सदाशिव मुरलीधर डोईफोडे (रा. संभाजी कॉलनी) व राजकुमार प्रकाश खंदारे (रा. गारखेडा परिसर) यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Guardian Turns Thief: Manager Scams Company with Fake Gold Loan

Web Summary : A Bajaj Finance manager in Waluj approved ₹11.90 lakh in fraudulent gold loans using fake gold and a fictitious customer. An internal audit revealed the scam, leading to a police investigation. Two suspects have been named.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर