‘बागेश्वरी’ने केली १० हजार एकरांवर उसाची लागवड

By Admin | Updated: October 25, 2014 23:47 IST2014-10-25T23:30:56+5:302014-10-25T23:47:24+5:30

शेषराव वायाळ, परतूर येथील माँ बागेश्वरी साखर कारखान्याने सुधारित वाणाच्या उसाची जवळपास दहा हजार एकरांवर लागवड केली आहे. तर खाजगीरित्या शेतकऱ्यांनीही दोन ते अडीच हजार एकरांवर

Bageshwari planted sugarcane on 10 thousand acres | ‘बागेश्वरी’ने केली १० हजार एकरांवर उसाची लागवड

‘बागेश्वरी’ने केली १० हजार एकरांवर उसाची लागवड


शेषराव वायाळ, परतूर
येथील माँ बागेश्वरी साखर कारखान्याने सुधारित वाणाच्या उसाची जवळपास दहा हजार एकरांवर लागवड केली आहे. तर खाजगीरित्या शेतकऱ्यांनीही दोन ते अडीच हजार एकरांवर उसाची लागवड केल्याने कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असल्याचे सांगितले जाते.
श्रध्दा एनर्जीचा माँ बागेश्वरी साखर कारखाना सुरु करण्याबरोबरच तो पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी कारखाना प्रशासन मागील दोन वर्षांपासून अहोरात्र परिश्रम घेत आहे. उसाची अडचण येऊ नये म्हणून कारखान्याने स्वत: ऊसाच्या सुधारित ८६०३२ व ३१०२ या वाणाची जवळपास ३ हजार ८९८. ७७ हेक्टर म्हणजे ९ हजार ७०० एकरावर व ५ बाय २ वर ठिबक सिंचन पध्दतीचा वापर करून लागवड केली आहे.
तर खाजगी रित्या शेतकऱ्यांनी २ ते अडीच हजार एकरावर लागवड केली आहे. हा ऊस जवळपास ६ लाख ७५ हजार मे. टन होत आहे, उसाची मोठया प्रमाणात लागवड होण्यासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना सुधारीत जातीचे बेणे, ठिबक सिंचन संच उपलब्ध करून दिले, तर निम्न दुधना प्रकल्पाच्या बॅक वॉटरवर २२ गावांना पाईप लाईनसाठी कर्जाची उपलब्धी करून देण्यात आली आहे.
पाच गटावर सुधरीत जातीच्या ऊस बेण्याची १७५ एकरावर लागवड करण्यात आली आहे. या सर्व सोयी सुविधामुळे कारखाना परीसरात उसाची लागवड वाढली आहे. कारखाना पूर्ण हंगाम चालण्यासाठी ५ लाख मे. टन ऊसाची गरज असते. कारखाना पूर्ण क्षमतेने चालण्याठी भागात ऊस पुरेसा असला तरी, अल्प पावसामुळे याच्या टनेजमध्ये घट होण्याची शक्यता असली, तरी कारखण्यासाठी ऊस कमी पडणार नाही असे सांगितल्या जाते. परतूर तालुका व परीसरातील हद्दपार होऊ लागलेले उसाचे क्षेत्र कारखान्याने सुविधा दिल्याने मोठया प्रमाणात वाढू लागले आहे. एकूणच ऊस लागवडीबद्दल शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. नगदी पिकामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

Web Title: Bageshwari planted sugarcane on 10 thousand acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.