शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बागडे - खैरे यांच्यात खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 20:37 IST

गेल्या काही दिवसांपासून खैरे व बागडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने आज पुन्हा एकदा शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे व फुलंब्रीचे आमदार व महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे  टीव्ही सेंटरवर जमलेल्या प्रचंड जनसमुदायाचे मात्र मनोरंजन झाले. सिडको- हडको या  शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच आज खा. खैरे हे बोलायला उठले, तेव्हा त्यांना वीस वर्षांचा हिशेब द्या, असा जाब पब्लिकमधूनच विचारला गेला. त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि ‘काय केले ... काय केले’ असा आवाज वाढला. त्यावर खैरे चिडलेही आणि म्हणाले, येतो तिकडं मी. जरा थांबा’ मात्र आपल्या भाषणात त्यांनी विचारलेल्या सवालाला उत्तर दिले नाही.   

गेल्या काही दिवसांपासून खैरे व बागडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राजाबाजार येथील एका छोट्या कार्यक्रमात खा. खैरे यांनी बागडे यांच्यावर टीका करून डिवचले. विधानसभेचे अध्यक्ष असले तरी हरिभाऊ बागडे गप्प कसे बसतील. क्रांतीचौकातील मनपाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीतच बागडे यांनी खैरेंची खरडपट्टी केली. शंभर कोटींच्या रस्ते कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे खैरे हे आज अध्यक्ष होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी खैरे की बागडे यावरूनही वाद रंगला होता.

आज बागडे बोलल्यानंतर अध्यक्ष म्हणून  खैरे बोलले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलले. त्या दिवशी आदित्य ठाकरे यांच्यासमोर आणि आज मुख्यमंत्र्यांसमोर बागडे यांनी खैरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. कानपिचक्या देत देत, बागडे म्हणाले, मनपाचे इथले सगळे पदाधिकारी बरं काम करतात. चांगलं काम करतात. पण खैरे त्यांना फ्री हँड देत नाहीत. पदाधिकाऱ्यांनी छोट्या छोट्या गोष्टीही विचारून कराव्या अशी वेळ त्यांच्यावर आणून सोडतात.’  अर्थात ही टीका खैरेंना झोंबली व त्यांनी बागडे यांच्या वयाचेही भान न ठेवता जोरदार हल्ला चढवला.‘तुमचा मतदारसंघ तिकडे बाजूला आहे. शहरही माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे मला महापालिकेतही लक्ष घालावे लागते. अशा शब्दांत खैरेंनी बागडे यांच्यावर पलटवार केला. 

यावरच खैरे थांबले नाहीत. ते म्हणाले ‘मी नॅशनल लीडर आहे.  उत्तर भारतातील अनेक राज्यांचे शिवसेनेचे काम बघतो. यांच्यासारखा मी नाही’ असा टोला त्यांनी मारला. दोघांचे हे वाक्युद्ध ऐकल्यानंतर सेना -भाजपमध्ये             निदान जिल्ह्यात तरी आलबेल नसल्याची कुजबुज उपस्थितांमध्ये ऐकू आली.

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेBJPभाजपाShiv Senaशिवसेना