वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा
By Admin | Updated: July 9, 2014 00:09 IST2014-07-08T23:34:36+5:302014-07-09T00:09:30+5:30
पालम : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठासह अनेक गावात वीटभट्टी सुरू आहेत. या वीटभट्टीचालकांनंी शासनाचा महसूल भरलेला नाही.

वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा
पालम : तालुक्यात गोदावरी नदीच्या काठासह अनेक गावात वीटभट्टी सुरू आहेत. या वीटभट्टीचालकांनंी शासनाचा महसूल भरलेला नाही. महसूल बुडविणाऱ्या वीटभट्टीचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहेत. यामुळे वीटभट्टीचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पालम तालुक्यात शेकडो वीटभट्टी सुरू आहेत. वीटभट्टी उद्योगात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने दरवर्र्षी वीटभट्यांची संख्या वाढत आहे. गोदावरी नदीच्या काठावर वीटभट्टीसाठी लागणारी चांगल्या दर्जाची माती असल्याने गोदाकाठच्या परिसरात वीज भट्यांची संख्या वाढली आहे. तसेच तालुक्यातील अन्य भागातही वीटभट्ट्या चालू आहेत. शासनाला वीटभट्टीचालकांकडून लाखो रुपयांचा महसूल मिळत असतो. परंतु यावर्षी अनेक वीटभट्टी चालकांनी अजूनही महसूल भरलेला नाही.
यामुळे लाखो रुपयांचा चूना शासनाला लागलेला आहे. वारंवार सूचना करूनही महसूल भरण्याकडे वीटभट्टीचालक दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे महसूल न भरणाऱ्या वीटभट्टीचालकांवर कारवाई करीत गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार अनिल देशपांडे यांनी दिले आहेत. यासाठी तलाठी सज्जा निहाय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
यामुळे वीटभट्टीचालकात खळबळ उडाली असून आजपासून कारवाईला सुरुवात झालेली आहे. (प्रतिनिधी)
कार्यवाहीस सुरुवात
पालम तालुक्यातील वीटभट्टीचालकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या कार्यवाहीस सुरुवात झाली आहे.
तालुक्यात दरवर्षी वीटभट्यांची संख्या वाढत आहे. गोदावरी नदीच्या काठांवरील माती या वीटभट्यांसाठी वापरली जाते.
वीटभट्टीचालकांकडून शासनाला महसूल मोठ्या प्रमाणात मिळत असतो. परंतु अनेक वीटभट्टी चालकांनी महसूल भरलेला नाही.