रिक्षात विसरलेली बॅग केली परत
By Admin | Updated: March 19, 2016 20:23 IST2016-03-19T20:06:26+5:302016-03-19T20:23:16+5:30
गंगाखेड : आॅटोरिक्षात विसरलेली बॅग चालकाने सदर प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.

रिक्षात विसरलेली बॅग केली परत
गंगाखेड : आॅटोरिक्षात विसरलेली बॅग चालकाने सदर प्रवाशाला परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे.
खळी येथील रुस्तुम दगडोबा झुरे (वय ३७) हे कामानिमित्त परभणी येथे राहतात. १७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता परिवारासह रेल्वेने गंगाखेड येथे आले होते. रेल्वेस्थानकावरून अहिल्यादेवी होळकर चौकात येतांना त्यांची बॅग आॅटोमध्येच विसरली. या बॅगमध्ये सोन्याचे दागिणे आदी मौल्यवान वस्तू होत्या. आॅटोचालक निवृत्ती सोपान गायकवाड (रा. मालेवाडी) यांनी आपल्या आॅटोमध्ये प्रवाशाची बॅग विसरून राहिल्याची माहिती पोलिसांना दिली. जमादार प्रकाश रेवले यांनी झुरे यांना बोलावून घेतले व आॅटोमध्ये विसरून राहिलेली बॅग हिच आहे का? याची खात्री करून घेतली. कल्याण साठे, मारोती सुरेवाड, शिवाजी टोले या पोलिस कर्मचाऱ्यांसमक्ष बॅग झुरे यांना परत केली. आॅटोचालक निवृत्ती गायकवाड यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिस प्रशासनाकडून त्यांचा गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)