बदनापूर ग्रा.पं. बरखास्त
By Admin | Updated: April 8, 2015 00:49 IST2015-04-08T00:33:42+5:302015-04-08T00:49:19+5:30
बदनापूर : गेल्या अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत बदनापूर : गेल्या अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत असलेल्या बदनापूर नगर पंचायत निर्माण होण्याचा मार्ग अखेर सुकर झाला असुन

बदनापूर ग्रा.पं. बरखास्त
बदनापूर : गेल्या अनेक दिवसांपासुन प्रतिक्षेत असलेल्या बदनापूर नगर पंचायत निर्माण होण्याचा मार्ग अखेर सुकर झाला असुन येथील ग्रा.पंं बरखास्त करून तहसिलदार बालाजी क्षीरसागर यांनी प्रशासक म्हणून पद्भार स्वीकारला आहे
शासनाने यापुर्वीच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ग्रा.पंना नगर पंचायतीचा दर्जा जाहीर केला असुन त्यानुसार तालुका स्तरावरील असलेली बदनापूर ग्रामपंचायत अखेर बरखास्त करण्यात आली असुन येथे नगर पंचायतची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार आज दि ७ एप्रिल रोजी तहसिलदार बालाजी क्षीरसागर यांनी प्रशासकाचा पद्भार स्वीकारला असून यावेळी त्यांचे सर्व पदाधिका-यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले याप्रसंगी तहसिलदार बालाजी क्षीरसागर म्हणाले की मागील पदाधिका-यांनी अनेक अडचणी असताना चांगले काम केलेले असुन आता यापुढे बदनापूरच्या पाणी प्रश्नाला प्राधान्य देण्यात येईल. येथील १८ कोटीची पाणीपुरवठा योजनेलाही गती देण्यात येईल तालुक्यातील पाणी टँकर भरण्यासाठी बदनापूर येथे शेंद्रा जालना पाईपलाईनमधून जिपकडे परवानगी मागीतली असुन यामुळे शासनाचा खर्च वाचणार आहे तसेच यापुढे बदनापूरच्या विकासाकरीता काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आली तर सर्व पदाधिका-यांनी व गावक-यांनी मला साथ दयावी असे आवाहन केले यावेळी माजी सरपंच राजन मगरे,राजेंद्र जैस्वाल,गोरखनाथ खैरे, माजी उपसरपंच शेख मतीन,जिप सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर, दलीत मित्र सांडुजी कांबळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग ज-हाड, आनंद इंदानी आदींनी मार्गदर्शन केले याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर बी शिंदे सत्यनारायण गेलडा, शेख अन्वर, बाबासाहेब क-हाळे, अनिल तुपे, माजी सरपंच राजन मगरे, राजेंद्र जैस्वाल, गोरखनाथ खैरे, माजी उपसरपंच शेख मतीन,जिप सदस्य बाळासाहेब वाकुळणीकर,दलीतमित्र सांडुजी कांबळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग ज-हाड,संदीप पवार,दिपक मुंडलीक, शेख समीर,अशोक अंबिलढगे, संतोष सिरसाठ,शेख युनुस आदिंसह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)