बदनापूर,भोकरदनमध्ये मुसळधार

By Admin | Updated: June 16, 2015 00:47 IST2015-06-16T00:34:01+5:302015-06-16T00:47:47+5:30

बदनापूर/भोकरदन : गेल्या चोवीस तासात बदनापूर व भोकरदन तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असुन यामुळे अनेक नदी नाल्यांना पुराचे पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

Badnapur, Bhokardan has a radical | बदनापूर,भोकरदनमध्ये मुसळधार

बदनापूर,भोकरदनमध्ये मुसळधार


बदनापूर/भोकरदन : गेल्या चोवीस तासात बदनापूर व भोकरदन तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला असुन यामुळे अनेक नदी नाल्यांना पुराचे पाणी आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे
बदनापूरमध्ये गेवराई, दुधनवाडी गोकुळवाडी परीसरात रविवारी झालेल्या पावसामुळे गोकुळवाडी गावात प्रथमच पुराचे पाणी घुसले. या पुराच्या पाण्यामुळे अनेक शेतजमिनीचे नुकसान झाले आहे या पुराच्या पाण्यामुळे सोमठाणा - बदनापूर रोडवरील वाहतूक काही काळ बंद झाली होती. तसेच दि १५ जून रोजी दुपारी बदनापूर शहरासह अनेक गावांमधे सर्वत्र दमदार पाऊस झाला असुन हा सुमारे दीड ते दोन तास पाऊस झाला. यामुळे शेतांमधे पाणीच पाणी दिसत होते. दुधना लाहुकी सुकना अशा अनेक प्रमुख नदयांसह अनेक नाल्यांना पुराचे पाणी आले आहे. सोमठाणा, वाल्हा, राजेवाडी आदी तलावांसह अनेक कोल्हापुरी बंधा-यांमधे पाणी आले आहे.
भोकरदन तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना समोरचे दिसत नसल्याने काही काळ अनेकांनी वाहतूक थांबविली होती. या पावसामुळे नदी, नाल्यांना पाणी आले आहे. या पावसामुळे काही ठिकाणी लागवड केलेले बियाणे वाया गेल्याचे बोलले जाते.
परतूर: परतूर तालूक्यात आजही पावसाने हजेरी लावली असून, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यातच आजच शाळा उघडल्याने मुलांचीही शाळेत जाण्यासाठी धांदल उडाली.संपुर्ण उन्हाळाभर सुर्य प्रचंड आग ओकत होता, तिव्र पाणी टंचाई, जिव घेणा उकाडा माणसासह पक्षी, प्राणी त्रस्त झाले होते. परतूर तालूका दुष्काळाचा सामना करत आहे. बाजरात शुकशुकाट होता, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळाची तिव्रता यावर्षी तापलेल्या सूर्याने अधिकच जाणवली.
४७ जूनपासून तालूक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सार्वांच्याच आशा पल्लवीत झाल्या आहेत. पहिल्याच पावसाने नदी नाले खळखळून वाहीले, बऱ्याच ठिकाणी पाणी पातळीवाढली शेतकऱ्यांच्या पेरणीचा मार्ग मोकळा झाला, बऱ्याच वर्षांनतर मृग नक्षत्र वेळेवर बरसल.े
४मागील वर्षी शेतकऱ्यांची पुरती पीक हातची गेली, कोणत्याच पिकाचे पैसे हातात पडले नाही मेटाकुटीस आलेला शेतकरी या वेळेवर झालेल्या पावसाने थोडा का होईना सुखावला आहे, व हे पावसाळी वातावरण पाहून पुन्हा जोमाने शेतीच्या कामाला लागला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँकाही लाथाडत आहेत. आता बँकाची कर्ज देण्याची आशा नसल्याने शेतकरी सावकार किंवा उधारीवर बियाणे, खते घेत आहेत. बियाणे बाजारात शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे.
बदनापूर तालुक्यात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोठा दिलासा मिळाला असला तरी तालुक्यातील गेवराई, सोमठाणा, गोकुळवाडी, दुधनवाडी, अकोला निकळक, धोपटेश्वर आदी सात गावात अतिवृष्टी झाल्याचे तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांनी सांगितले.
४औरंगाबाद - जालना रोडवर या पावसामुळे खड्डेही निर्माण झाले आहेत. पावसामुळे काही काळ वाहतूक देखील विस्कळीत झाली होती. बाजारपेठेत गेलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.
जालना : जालना शहरात सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाने जुना जालना भागातील पुलावर पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली. तर नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने सफाई मोहिमेचे धिंडवडे निघाले.
४मंठा : तालुक्यात मृग नक्षत्र लागल्यापासून पावसाला सुरूवात झाली. यामुळे तालुक्यात पेरणीने वेग घेतला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीचे काम आटोपून घेतली होती.

Web Title: Badnapur, Bhokardan has a radical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.