शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांवर बडतर्फीचा दंडुका

By admin | Updated: November 10, 2014 01:18 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड शासनाच्या विविध विभागात सध्या कार्यरत असलेल्या बोगस स्वातंत्र्यसैनिकाच्या पाल्यावर बडतर्फीचे हत्यार जिल्हा प्रशासनाने उगारले आहे़ बीड जि़ प़ अंतर्गत शिक्षण

व्यंकटेश वैष्णव , बीडशासनाच्या विविध विभागात सध्या कार्यरत असलेल्या बोगस स्वातंत्र्यसैनिकाच्या पाल्यावर बडतर्फीचे हत्यार जिल्हा प्रशासनाने उगारले आहे़ बीड जि़ प़ अंतर्गत शिक्षण विभागात विस्तार अधिकारी पदावर काम करीत असलेल्या एकाला अपर जिल्हाधिकारी यांनी बडतर्फ करण्याचे आदेश जि़ प़ चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत़ यामुळे जिल्ह्यातील बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांचे धाबे दणाणले आहेत़शासनाने स्वातंत्र्यसैनिक निवृत्ती वेतन प्रकरणाच्या फेरपडताळणीसाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात एकूण २९८ बोगस स्वातंत्र्यसैनिक आहेत़ या बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य जिल्ह्यातील विविध विभागात नौकरी करीत आहेत़ त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्याचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी, बीड यांनी नुकताच दिला आहे़ यावरून बीड जिल्हा परिषदेंतर्गत आष्टी येथे शिक्षण विभागात कार्यरत मनोरंजन रावसाहेब धस (रा़ जामगाव, ता़ आष्टी) यांना बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत़ दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ज्यांनी बोगस प्रमाणपत्र दाखवून शासनाच्या विभागात नौकरी मिळवलेली आहे त्यांच्याकडून रूजू झालेल्या दिवसापासून उचलेले वेतन व्याजासह वसूल करावे. आष्टी येथील धस हे २००४ मध्ये जिल्हा परिषदेत नौकरीला लागले होते. सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील कृषी विभागातील कृषी सहायक व बोगस स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असलेल्या चार जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. यानंतर जिल्ह्यातील इतर शासकीय विभागात बोगस प्रमाणपत्रावर नौकरी मिळविलेले अधिकारी कर्मचारी आहेत. त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश काढण्याच्या हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले़