बोरगाव- नागापूर म्हैसघाट रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:04 IST2021-05-17T04:04:16+5:302021-05-17T04:04:16+5:30
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील बोरगाव-नागापूर-म्हैसघाट रस्त्यावरील वाकद-जामडी फाट्याजवळील पुलाचे काम तसेच चिंचोली लिंबाजी ते पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पादरम्यानच्या ...

बोरगाव- नागापूर म्हैसघाट रस्त्याची दुरवस्था
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील बोरगाव-नागापूर-म्हैसघाट रस्त्यावरील वाकद-जामडी फाट्याजवळील पुलाचे काम तसेच चिंचोली लिंबाजी ते पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पादरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. परिणामी येथील खडतर रस्त्याचा सामना वाहनधारकांना करावा लागत असल्याने ही वाट जीवघेणी ठरू लागली आहे.
बोरगाव-नागापूर-म्हैसघाट रस्त्यावरील वाकद-जामडी फाट्याजवळील पुलाचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. ठेकेदार व संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने हे काम पूर्णत्वास जाईना. तसेच चिंचोली लिंबाजी ते पूर्णा-नेवपूर मध्यम प्रकल्पाच्या दरम्यान पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डे असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावरून खडी व डांबर गायब झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. सुरुवातीला झालेल्या निकृष्ट कामामुळेच रस्त्यांची ही आजची परिस्थिती आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
----
संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करून पुलाचे अर्धवट काम पूर्ण करावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण जंजाळ पाटील यांनी केली.
----
150521\20210515_172624_1.jpg
रस्त्याची झालेली दुरावस्था