शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मनपाच्या पिचवर आले बकोरिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:34 IST

महापालिकेचा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम सांभाळत असले तरी १५ डिसेंबरनंतर मनपात आयुक्त कोण? असा प्रश्न शहराला पडलेला आहे. त्यातच अचानक रविवारी महापालिकेच्या पिचवर येऊन माजी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी फलंदाजी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बकोरिया एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मनपा सभागृहात ज्या पदाधिकारी व नगरसेवकांसोबत त्यांचे वारंवार खटके उडत त्यांच्यासोबत त्यांनी प्रदीर्घ चर्चाही केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचा आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम सांभाळत असले तरी १५ डिसेंबरनंतर मनपात आयुक्त कोण? असा प्रश्न शहराला पडलेला आहे. त्यातच अचानक रविवारी महापालिकेच्या पिचवर येऊन माजी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी फलंदाजी केली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बकोरिया एवढ्यावरच थांबले नाहीत, तर मनपा सभागृहात ज्या पदाधिकारी व नगरसेवकांसोबत त्यांचे वारंवार खटके उडत त्यांच्यासोबत त्यांनी प्रदीर्घ चर्चाही केली.ओम प्रकाश बकोरिया हे नाव ऐकताच आजही अनेक अधिकारी व कर्मचाºयांच्या मनात धडकी भरते. मनपातील काही पदाधिकारी तर बकोरिया यांच्या केबीनसमोरूनही जात नसत. अचानक त्यांचा सामना झाल्यास ते काही तरी बोलतील एवढी भीती काही नगरसेवकांना होती. ओसाड गरवारे क्रीडा संकुलाला नवसंजीवनी देण्याचे कामही त्यांनी केले. रविवारी या क्रीडा संकुलाचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमास खास बकोरिया यांनाही निमंत्रण देण्यात आले. महापालिका हा आवडीचा विषय असल्याने त्यांनीही निमंत्रण स्वीकारून महापालिकेच्या पिचवर हजर झाले. यावेळी त्यांनी मनसोक्तपणे नवीन पिचवर फलंदाजी केली. विशेष बाब म्हणजे सभागृहात नेहमी नगरसेवक राजू शिंदे यांच्यासोबत त्यांचे शाब्दिक खटके उडत असत. रविवारी दोघेही कानगोष्टी करताना दिसून आल्याने अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले.सामना आम्हीच जिंकणार...लोकार्पण सोहळ्याच्या वेळी पहिल्याच चेंडूवर महापौर नंदकुमार घोडेले यांचा त्रिफळा उडाला. नंतर महापौर आपले मनोगत व्यक्त करीत असताना आ. अतुल सावे यांनी सेना-भाजप नगरसेवकांचा सामना ठेवा, अशी सूचना केली. यावर महापौर म्हणाले पिचवर माझी विकेट पडली तरी राजकारणात मी सेफ आहे. युतीचा सामना ठेवल्यास सेनेचेच नगरसेवक जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.