बाबुलताराचे तलाठी लाचेच्या सापळ्यात
By Admin | Updated: September 11, 2014 00:36 IST2014-09-11T00:33:08+5:302014-09-11T00:36:56+5:30
जालना : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील तलाठी प्रल्हाद धोंडिबा देशमुख यांना १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास ४०० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

बाबुलताराचे तलाठी लाचेच्या सापळ्यात
जालना : परतूर तालुक्यातील बाबुलतारा येथील तलाठी प्रल्हाद धोंडिबा देशमुख यांना १० सप्टेंबर रोजी दुपारी १२.२० वाजेच्या सुमारास ४०० रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी लाचेची मागणी केली.
यासाठीची कागदपत्रे देशमुख यांना दिल्यानंतर २ हजार रूपयांची मागणी केली. संबंधिताने दीड हजार रूपये लगेच दिले. देशमुख यांनी काम झाल्यावर आणखी ५०० रूपये देण्याचे सांगितले. बरेच दिवस होऊनही काम झाले नसल्याने २ सप्टेंबर रोजी सातबारा दिले. यात तक्रारदाराच्या भावाचे नाव चुकीची नोंद घेतली. ती दुरूस्त करून फेरफारची नोंद आॅनलाईन करण्यासाठी ५०० रूपयांची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने वाटूर येथे त्यांच्या कामकाजाच्या खोलीवर पकडले. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक प्रताप शिकारे, पोलिस निरीक्षक एस.एम. मेहत्रे, किशोर पाटील, नंदू शेंडीवाले, गंभीर पाटील, अमोल आगलावे, संजय राजपूत यांनी केली.