शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

सतर्कतेमुळे वाचले बाळ; ‘ती’ माता २० दिवसांच्या बाळाला पाण्यात बुडवी अन्...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 16:00 IST

मनोरुग्ण महिलेची २० दिवसांपूर्वीच शेजारी राहणाऱ्या महिलांच्या मदतीने प्रसूती झाली.

ठळक मुद्देसदर महिला बाळाचा सांभाळ करू शकत नव्हतीकुत्र्याचेही बाळावर  भक्ष्य म्हणून लक्ष

औरंगाबाद : ‘वेड्या आईची वेडी माया’ असे म्हटले जाते; परंतु एक मनोरुग्ण माता स्वतःच्या अवघ्या २० दिवसांच्या बाळाला पाण्याच्या डबक्यात बुडवीत होती. दिवसभर त्याला घेऊन फिरत असे. बाळाच्या अंगावर कपडे घालत नव्हती. तिच्या कुटुंबियांनाही बाळाचा ताबा देत नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्त्या आणि दामिनी पथकाच्या मदतीने बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असून, लवकरच बाळाचे आणि मनोरुग्ण मातेचे पुनर्वसन केले जाणार आहे. 

शहरातील गांधीनगर भागात एका मनोरुग्ण महिलेची २० दिवसांपूर्वीच शेजारी राहणाऱ्या महिलांच्या मदतीने प्रसूती झाली. प्रसूतीनंतर या मनोरुग्ण मातेने बाळाचा ताबा घेतला. तिच्या आई-वडील, भावांनी बाळ स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती आक्रमक होत होती. गेले काही दिवस ही माता बाळाला घेऊन दिवसभर परिसरात फिरत होती. परिसरातील पाण्याच्या डबक्यात बाळाला आंघोळ घालत होती. हा प्रकार काही लोकांनी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा चुडीवाल यांना कळविला. शिल्पा चुडीवाल यांनी या महिलेविषयी अधिक माहिती घेतली.

सदर महिला बाळाचा सांभाळ करू शकत नव्हती. त्यातून नवजात बाळाचे हाल होत होते. अखेर सामाजिक कार्यकर्त्या, पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले.  कुटुंबियांनी बाळाचे पुनर्वसन करण्यासाठी बालकल्याण समितीची मदत घेतली. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांच्या  मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस उपनिरीक्षक बागूल, पोलीस नाईक आशा गायकवाड, पोलीस शिपाई गिरिजा आंधळे यांनी बुधवारी बाळाचा ताबा घेतला आणि अधिक उपचारासाठी घाटीत दाखल केले. 

कुत्र्याचेही  बाळावर  भक्ष्य म्हणून लक्षया बाळाला कुत्र्याकडून उचलून नेण्याचा प्रयत्न झाला; परंतु एका महिलेच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार टळला. त्या महिलेने बाळाला जवळ घेतले; परंतु तेव्हा मनोरुग्ण माता त्या महिलेवरच धावून गेली होती.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद