महापौैर पदाने सन्मान दिला : खानापुरे

By Admin | Updated: November 21, 2014 00:47 IST2014-11-21T00:36:04+5:302014-11-21T00:47:36+5:30

लातूर : महापौर पदाने मला सन्मान दिला. या पदावर बसल्यावर अनंत संकटांचा सामना करावा लागला. तरी सर्वांच्या सहकार्याने केलल्या विकासकामांबाबत मी समाधानी आहे,

Awarded the Great Pioneer: Khanapure | महापौैर पदाने सन्मान दिला : खानापुरे

महापौैर पदाने सन्मान दिला : खानापुरे


लातूर : महापौर पदाने मला सन्मान दिला. या पदावर बसल्यावर अनंत संकटांचा सामना करावा लागला. तरी सर्वांच्या सहकार्याने केलल्या विकासकामांबाबत मी समाधानी आहे, असे प्रतिपादन मावळत्या महापौैर प्रा. स्मिता खानापुरे यांनी आपल्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या शेवटच्या पत्रपरिषदेत म्हणाल्या.
गुरुवारी महापौैर खानापुरे आणि उपमहापौैर सुरेश पवार यांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे निवड झालेले परंतु प्रतिक्षेत असलेले महापौैर अख्तर शेख आणि उपमहापौैर कैैलास कांबळे हे उद्या शुक्रवारी पदभार घेण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर प्रा. खानापुरे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, महापालिका नवीन होती. त्यामुळे प्रश्नच प्रश्न होते. अधिनियमाबाबत सर्वजण अनभिज्ञ होते. शासनाने एलबीटी लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध केला. पथदिव्यांच्या अडचणी आल्या. कचरा व पाण्याची समस्या उभी राहीली, कर्मचाऱ्यांची वाणवा होती या साऱ्या संकटात पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाने वाटा शोधल्या. गेल्या अडीच वर्षात महापालिकेत विकासगंगा आणल्याचा दावा करुन त्या म्हणाल्या, आकृतीबंधाची मंजुरी, सुवर्णजयंती नगरोत्थान अंतर्गत राज्यस्तरचे १३३ कोटी व राज्यस्तरचे २१ कोटी, नाट्यगृहाची उभारणी, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना, साई, नागझरीचे पुनर्जिवन, मिनी वॉटर सप्लाय स्किमचे सक्षमीकरण, विवेकानंद चौैकापासून पीव्हीआर चौैकापर्यंत एलईडी लाईटचे काम, ४८ तासात जन्म दाखला, फेरीवाला धोरण याबाबत धोरणे राबविता आली. शहर बस वाहतूक आणि लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना यांना मान्यता आणल्या. या माझ्या जमेच्या बाजू आहेत. या काळात उपमहापौैर सुरेश पवार, पक्षनेते, गटनेते, विरोधी पक्षनेत्यांचे सहकार्य मिळाल्याचेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
लातूरचा पहिला महापौर होण्याचा मान आपल्याला काँग्रेस पक्षाने दिला. त्यामुळे सन्मान झाला. नवीन मनपा असल्यामुळे अडचणी होत्या. परंतु, त्या अडचणींवरही मात करीत अनेक कामे मार्गी लावली.
४मनपा नवीन असल्यामुळे अनेक प्रश्न होते. नियम, अटी, कायदे या संदर्भात माहिती नव्हती. तरीही मनपातील सदस्यांनी याचा अभ्यास करून मनपा समजून घेतली.
४शहर वाहतूक बस आणि लिंबोटी धरणातून पाणी योजना आपल्यासाठी महत्वाचे होते.

Web Title: Awarded the Great Pioneer: Khanapure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.