शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या रोगांना आळा घाला

By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST

वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डेंग्यूमुळे गेल्या आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे तात्काळ आरोग्य सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाळूज महानगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डास वाढले आहेत. दूषित पाणी व परिसरातील दुर्गंधीमुळे डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवताप, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. डेंग्यूमुळे बजाजनगरात २७ वर्षांचा तरुण व ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही साथीच्या रोगाचे लोण पसरत आहे. या भागातील साथीच्या रोगांचे अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही शासनाच्या वतीने तात्काळ औषधोपचाराचे वाटप करून वेगवेगळ्या भागांत आरोग्य शिबिरांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्य जागृती करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस संजय तायडे, जिल्हा सचिव जनार्दन निकम पाटील, वाळूज महानगर अध्यक्ष शरद पाटील, राजू डोईफोडे, बंडू पुरी, काकासाहेब सुलताने, नामदेव मानकापे, प्रकाश निकम, महिला तालुकाध्यक्ष दुर्गा निंबोळकर यांची नावे आहेत. बंद पडलेले भूमिगत गटारीचे काम सुरू करावाळूज औद्योगिक निवासी क्षेत्र व बजाजनगरात एमआयडीसीच्या वतीने सुरू करण्यात आलेले भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. हे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे सामाजिक विचार मंचने केली आहे. बजाजनगर वसाहतीत गटारी उघड्या पडल्या आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचते, खदानीतील पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया आदी साथरोगांना तोंड द्यावे लागत आहे. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे बजाजनगरमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. एवढे सगळे घडूनही एमआयडीसी प्रशासन ठोस भूमिका घेत नसून, अनेक ठिकाणी सांडपाणी व कचऱ्याने गटारी भरल्या आहेत. याकडे सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गजानन नांदूरकर, सचिव केशव ढोले, विकास पाटील, प्रदीप वडतकर, विठ्ठल कांबळे, दिलीप दबडे, चिंतामणी शेटे, सतीश कोरडे, प्रल्हाद माने, नानेश्वर धुर्वे, व्यंकट टेकाडे, मधुकर नाटकर, सातप्पा जगताप, सुधाकर शेवाळे, ज्ञानेश्वर गवळी, गजानन तुपसुंदर, श्रीकृष्ण अंबडकर यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.