२०१ ग्रा.पं.साठी जिल्ह्यात सरासरी ८०% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 00:39 IST2017-10-08T00:39:05+5:302017-10-08T00:39:05+5:30

जिल्ह्यात शनिवारी २०१ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के शांततेत मतदान झाले

Average voting percentage of 80% in the district for 201 G.P. | २०१ ग्रा.पं.साठी जिल्ह्यात सरासरी ८०% मतदान

२०१ ग्रा.पं.साठी जिल्ह्यात सरासरी ८०% मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी २०१ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के शांततेत मतदान झाले. मतदानासाठी ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह दिसला. काही ठिकाणी पाऊस आल्याने मतदानावर थोडा परिणाम झाला. काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड व वीज खंडित झाल्याने अडथळा आला होता. सिल्लोड तालुक्यात ८०.१८ टक्के, कन्नड-७६.०५, पैठण-८९, गंगापूर-८६.५३, वैजापूर-८२.९९, खुलताबाद-८८.३९, सोयगाव-८२.०३, फुलंब्री-८८ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होईल.

Web Title: Average voting percentage of 80% in the district for 201 G.P.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.