शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

मराठवाड्यात सरासरी ५९ टक्के पावसाची तूट; पेरण्या खोळंबल्या, परिस्थिती गंभीर वळणावर

By विकास राऊत | Updated: July 5, 2023 12:18 IST

धरणांमध्ये केवळ ३३ टक्के पाणी; जून महिन्यात मोठ्या धरणांमध्ये पाण्याची आवक शून्य टक्के

छत्रपती संभाजीनगर : पावसाअभावी मराठवाड्याची परिस्थिती गंभीर वळणावर आली आहे. जून महिन्यातील १३४ मि.मी. सरासरीच्या तुलनेत ५५ मि.मी. पाऊस विभागात झाला आहे. ५९ टक्के पावसाची तूट गेल्या महिन्यात राहिल्यामुळे त्याचा परिणाम खरीप हंगामातील पेरण्यांवर झाला आहे.चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करीत असलेल्या आठही जिल्ह्यांत यंदाचा जून महिना समाधानकारक राहिला नाही. जुलै महिन्यात दमदार पाऊस होईल, असे भाकित हवामान खात्याने केले आहे; परंतु पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट देखील येण्याची शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती पाहता टँकरने पाणीपुरवठा, विहिरी अधिग्रहण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

धरणांमध्ये ३३ टक्के पाणीमराठवाड्यातील ११ मोठ्या धरणांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी ४१ टक्के साठा होता. जायकवाडी धरणात २६ टक्के, निम्न दुधना २५, येलदरी ५५, सिद्धेश्वर प्रकल्प कोरडा आहे. माजलगाव प्रकल्पात १६.७१ टक्के, मांजरा २०, पैनगंगा ४२, मानार ३२, निम्न तेरणा २९, विष्णुपुरी ३९, तर सीना कोळेगाव प्रकल्पात ५ टक्के उपयुक्त जलसाठा सध्या आहे.

जूनमध्ये किती पावसाची तूट?विभागाच्या वार्षिक सरासरीनुसार जूनमध्ये १३४ मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते. ५५ मि.मी.पाऊस झाला असून, हा ४१ टक्केच पाऊस आहे. त्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. जून महिन्याच्या एकूण सरासरीनुसार औरंगाबादमध्ये ५८ टक्के, जालना ४६, बीड ४३, लातूर ४४, धाराशिव २६, नांदेड २९, परभणी ३८, हिंगोलीत २६ टक्के पाऊस झाला आहे.

टँकरचा आकडा शतकाकडे८५ गावे आणि २४ वाड्यांमध्ये ९९ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ४३ गावांना ३७ टँकर, जालना २८ गावांना ४४ टँकर, तर हिंगोलीत १० गावांना १२ टँकर, नांदेडमध्ये ४ गावांना ६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ९५५ विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे.

पेरण्यांचा टक्का वाढेनामराठवाड्यात आजवर २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी ४५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या होत्या. पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढत नसून याचा परिणाम पीक उत्पादकतेवर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरी