मराठवाड्यात सरासरी ११ मि. मी. पाऊस
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T00:50:40+5:302014-07-08T01:06:07+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यावर दुष्काळाची दाट छाया पडलेली असताना रविवारी रात्री मराठवाड्यात पाऊस झाला. नांदेड आणि हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली.

मराठवाड्यात सरासरी ११ मि. मी. पाऊस
औरंगाबाद : मराठवाड्यावर दुष्काळाची दाट छाया पडलेली असताना रविवारी रात्री मराठवाड्यात पाऊस झाला. नांदेड आणि हिंगोली वगळता उर्वरित सहा जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावली. विभागात सरासरी ११ मि. मी. तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक २१ मि. मी. पावसाची नोंद झाली.
मराठवाड्यावर यंदा पावसाने सुरुवातीपासून अवकृपा केली आहे. जून महिन्यात एक दोन वेळा हजेरी लावल्यानंतर पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे जुलै महिना सुरू झाला तरी विभागात अद्याप खरिपाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद, फुलंब्री, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात तो झाला नाही. जालना जिल्ह्यातही जाफ्राबाद वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात परभणी वगळता सर्व तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांतही चांगला पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात १.६ मि. मी. पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यावर पावसाची अवकृपा कायम आहे.
जिल्हानिहाय पाऊस
औरंगाबाद-१५.३४
जालना -१०.९९
परभणी -१५.९१
हिंगोली-१.६
नांदेड-००
बीड-२१.६२
लातूर- १०.०८
उस्मानाबाद - १२.७८
एकूण- ११.१३