पुस्तकातही अवतरले कार्टून्स

By Admin | Updated: May 25, 2014 01:03 IST2014-05-25T00:56:55+5:302014-05-25T01:03:15+5:30

गजानन वानखडे , जालना शाळा सुरू व्हायला जवळपास तीन आठवडे शिल्लक असताना पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात दाखल झाली आहेत.

Avatarale cartoons in book | पुस्तकातही अवतरले कार्टून्स

पुस्तकातही अवतरले कार्टून्स

 गजानन वानखडे , जालना शाळा सुरू व्हायला जवळपास तीन आठवडे शिल्लक असताना पहिली ते दहावीची बहुतांश पाठ्यपुस्तके बाजारात दाखल झाली आहेत. यंदा प्रथमच पहिली ते चौथीपर्यंतची पुस्तके लॅमिनेशनसह मिळणार आहेत. पहिले ते पाचवीपर्यंतच्या चिमुकल्यांना भडक रंग, चित्रांचे मोठे आकर्षण असते. कार्टूनच्या जगात वाढणारी ही मुले पाठ्यपुस्तकांपासून दूर राहणार नाहीत, याची दक्षता घेत पुस्तकांतून कार्टून्ससह विविध चित्रे देण्यात आली आहेत. ही पुस्तके वारंवार हाताळली, तरी खूप दिवस टिकावीत, यासाठी त्यांना लॅमिनेशनही करण्यात आले आहे. या लॅमिनेशनमुळे पुस्तकांचे आयुष्य वाढणार असून त्याची पाने गळणार नाहीत. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक केल्यामुळे विद्यार्थ्यांची पुस्तकाबद्दल उत्सुकता टिकून राहिल. विशेष म्हणजे पुस्तकातील चित्रे आकर्षक दिसण्यासाठी मॅपलिथो नावाच्या शुभ्र पांढर्‍या कागदाचा वापर करण्यात आला आहे. पुस्तकातील रंगीबेरंगी चित्रे अत्यंत आकर्षक दिसतात. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी वाढावी, धडा समजावून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी खास पुस्तकामध्ये बोलक्या चित्राची जोड देण्यात आली आहे. तासन्तास कार्टूनच्या बघणार्‍या मुलांची कार्टून्स व चित्रामुळे पुस्तकाशीही जवळीकता राहील, अशी अपेक्षा पुणे येथील पाठ्यपुस्तक महामंडळाचे संचालक चंद्रमणी बोरकर यांनी व्यक्त केली. यावर्षी २५ टक्क्यांनी छपाई खर्चात वाढ झाली आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आदी विषय मिळून परिसर अभ्यासाचे पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाने काढले आहे. त्यामध्ये जिल्ह्यासंबंधी माहिती, जिल्हातील प्रमुुख रस्ते, नकाशे, जिल्हा कशासाठी प्रसिध्द आहे, आदी त्या-त्या जिल्हातील संपूर्ण माहिती चित्रमय स्वरूपात दिली आहे. या माहितीचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे बोरकर यांनी सांगितले. या पुस्तकाच्या छपाईसाठी मॅपलिथो नावाचा पांढरा शुभ्र कागद वापरण्यात आला आहे. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे या कागदावरील चित्रे आकर्षक आणि रंगामंध्ये उठावदार दिसतात. धडा समजून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण करील, अशा बोलक्या चित्राची जोड त्याला देण्यात आली आहे. कार्टून मालिका बघणार्‍या मुलाची पुस्तकातील कार्टून चित्रामुळे पुस्तकाशी जवळीकता साधेल. चित्रमय माहितीमुळे पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच अभ्यासामध्ये रूची निर्माण होईल. आकर्षक व रंगीत कार्टूनच्या सजावटीमुळे विद्यार्थ्यांना ही पुस्तके नक्कीच आवडतील आणि अभ्यासही होईल. - मोहम्मद इफ्तेखारोद्दीन, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कूल जालना नवीन पुस्तके अतिशय दर्जेदार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची पुस्तके मिळाल्याने विद्यार्थी चांगला मन लावून अभ्यास करतील. चित्रांमुळे का होईना मुले पुस्तके हाताळतील. लॅमिनेशन असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकतील. - गणेश पांगारकर, केंद्र्रप्रमुख, वाघु्रळ पुस्तकांची मांडणी सुरेख आहे. विविध चित्रांनी पुस्तके सजवून संपूर्ण माहिती दिल्याने चिमुकले या पुस्तकाकडे नक्कीच आकर्षित होतील. लॅमिनेशनसह असल्याने पावसाळ्यात ते भिजणार नाहीत. त्याचा दर्जा टिकून राहिल. -बाबासाहेब जुंबड, शिक्षक

Web Title: Avatarale cartoons in book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.