स्वयंचलित हवामान केंद्रांचे भिजत घोंगडे
By Admin | Updated: August 29, 2014 01:26 IST2014-08-29T00:39:43+5:302014-08-29T01:26:52+5:30
भास्कर लांडे , हिंगोली केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्वयंचलित हवामान केंद्रास’ अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. तीन वर्षांपूर्वी घोषणा करून गावोगावी जागा तेवढी आडून धरली.

स्वयंचलित हवामान केंद्रांचे भिजत घोंगडे
भास्कर लांडे , हिंगोली
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘स्वयंचलित हवामान केंद्रास’ अद्यापही मुहूर्त लागलेला नाही. तीन वर्षांपूर्वी घोषणा करून गावोगावी जागा तेवढी आडून धरली. आजघडीला मराठवाड्यात सर्वत्र केंद्र सुरू झाले असताना आयुक्त कार्यालयाकडे मेल, फॅक्स आणि फाईल जावूनही या केंद्राचे भिजत घोंगडे कायम आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे हा प्रकार घडत आहे.
देशाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला स्वंयचलित हवामान केंद्र राज्यात सर्वत्र राबविण्यात आला. जिल्ह्यात त्यानुसार ४७ ठिकाणांची निवड सुरूवातीला करण्यात आली होती. अखेरीस ३० हवामान केंद्र उभारण्याचे निश्चित करण्यात आले. कृषी विभागाने महसूल मंडळनिहाय जागाही घेतली. दरम्यान ,आयुक्तांकडे या केंद्राची माहिती ई-मेल, फॅक्स आणि फाईलद्वारे देण्यात आली. आज त्याला तीन वर्षांचा कालवाधी लोटला तरी या केंद्रांचे भिजत घोंगडे कायम आहे.
केंद्रासाठी निधी मिळत नाही, अशीही काही समस्या नसल्यामुळे वरिष्ठ कार्यालयाच्या निधीची गरज नाही. जिल्हा कार्यालयास याबाबत पूर्ण अधिकार असताना याबद्दल अधिकाऱ्यांची अनास्था दिसून येते. आजमितीला या केंद्रांचा विसरच कार्यालयास पडला. परिणामी, असे केंद्र स्थापन करण्यासाठी एकाही अधिकाऱ्याची धडपड दिसून येत नाही. तीन वर्षांपासून जरासीही हालचाल कृषी विभागाने केलेली नाही. दरम्यान, दोन कृषी अधिकारी आणि दोन तंत्र अधिकारी येवून गेले. वर्षभरापासून आलेल्या शिवाजी पवार यांनाही या केंद्राचा विसर पडला.
विकासात भर घालणाऱ्या या प्रकल्पाविषयी एकही लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाही. अधिकाऱ्यांना कोणी जाबही विचारत नाही. मुळात उत्पादकांच्या हिताविषयी कोणीही अग्रही भूमिका घेणारा लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी नाही. सस्त लोकप्रतिनिधी आणि धिम्न प्रशासानामुळे जिल्ह्यातील कृषी विकास खुंटल्याचे ‘कृषी दिनानिमित्त’ म्हणावे लागेल.