शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावणार स्वयंचलीत यंत्र; विद्यार्थ्यांच्या संशोधनास देशात दुसरे बक्षीस

By राम शिनगारे | Updated: June 12, 2023 19:46 IST

बळीराजाचे श्रम कमी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या संशोधनास देशातून दुसरे पारितोषिक

छत्रपती संभाजीनगर : शेतात काढलेल्या सरीवर टोमॅटो, मिरची अन् वांग्याची रोप लावायची असतील तर आता माणसाची गरज लागणार नाही. ट्रेमध्ये ठेवलेली रोपे स्वयंचलीत यंत्र जमिनीमध्ये लागवड करणार आहे. अशा अत्याधुनिक यंत्राची निर्मिती छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. हे यंत्र राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर देशातून द्वितीय क्रमांक पटकावला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी दिली.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेला संधी मिळण्यासाठी सोसायटी फॉर ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया दरवर्षी नवनवीन कल्पना घेऊन स्पर्धा आयोजित करीत असते. यावर्षी जॉन डिअर इंडिया प्रा.लि. व महिंद्रा ॲण्ड महिंद्रा यांच्य संयुक्त विद्यमाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात नुकतीच दोन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धा पार पडली. त्यामध्ये 'स्वयंचलीत पालेभाजी रोपण यंत्र' हा विषय देण्यात आला होता. यामध्ये छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देशी बनावटीचे साहित्य वापरून महाविद्यालयाच्या कार्यशाळेत एका यंत्राची निर्मिती केली. त्या यंत्रातून टोमॅटो, मिरची, वांगी यासारख्या भाज्यांची लागवड यंत्राच्याद्वारे करता येत आहे. 

देशभरातून या स्पर्धेत एकुण ५४ अभियांत्रकी व कृषी महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. दोन टप्प्यात झालेल्या या स्पर्धेत छत्रपती शाहू अभियांत्रकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेले यंत्र उत्कृष्ट ठरले. अंतीम फेरीत या यंत्रास द्वितीय पारिषोषिक मिळाले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एक लाख रुपयांचे पारितोषीकदेशभरातून आलेल्या महाविद्यालयांमध्ये छत्रपती शाहू अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांच्या संघाने तयार केलेल्या यंत्राला द्वितीय पारितोषीक मिळाले. या पारितोषीकाची रक्कम १ लाख रुपये एवढी आहे. विद्यार्थ्यांच्या संघाचे नेतृत्व वैभव जाधव याने केले. विद्यार्थ्यांच्या संघास प्रा. सचीन लहाने, प्रा. युवराज नरवडे, शुभम गुप्ता, यांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.आर.पी.चोपडे, प्रशिक्षणचे प्रा. संजय कुलकर्णी, डॉ. मनोज मते, प्रा. एस.एन. पाटील, प्रा. विष्णू खडप, प्रा. सुनील जाधव, प्रा. दीपक पवार, प्रा. अनिल मालकर आणि जनार्धन कांबळे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीAurangabadऔरंगाबादEducationशिक्षणFarmerशेतकरीagricultureशेती