उद्यापासून आॅटोरिक्षा तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 00:52 IST2016-03-14T00:48:19+5:302016-03-14T00:52:16+5:30

औरंगाबाद : शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. अत्यल्प रिक्षाचालक मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करतात

Auto detective campaign from tomorrow | उद्यापासून आॅटोरिक्षा तपासणी मोहीम

उद्यापासून आॅटोरिक्षा तपासणी मोहीम

औरंगाबाद : शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जाते. अत्यल्प रिक्षाचालक मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक करतात. याबाबतच्या तक्रारी प्रवाशांकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) आणि पोलीस आयुक्तांना प्राप्त होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आरटीओ आणि शहर पोलिसांकडून मंगळवारपासून आॅटोरिक्षांची तपासणी केली जाणार आहे.
याविषयी प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी कळविले की, रिक्षाचालक, मालकांकडून रिक्षा भाडे आकारणी मीटरप्रमाणे न करता मनमानी पद्धतीने केली जात आहे. रिक्षाचालकांनी नियमाप्रमाणे प्रवासी भाडे आकारणी करावी, नियमांचे उल्लंघन करून विनामीटर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांचे परवाने निलंबित केले जाणार आहेत. रिक्षांना तीनपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्यास मनाई आहे. तर शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षात केवळ पाच विद्यार्थी बसविण्याची परवानगी आहे. ग्रामीणचा परवाना असताना शहरात प्रवासी वाहतूक करणे गुन्हा आहे.

Web Title: Auto detective campaign from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.