शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक वाढवत आहेत असत्याची चळवळ: सुधीर गव्हाणे

By स. सो. खंडाळकर | Updated: October 10, 2023 16:30 IST

दलितांचा खूप विकास झाला असून, त्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा भ्रम पसरवला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर : देशात बुद्धिप्रामाण्यवाद आणि नैतिकतेला लाथा मारून समाजाला दूषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’चे लेखक असत्याची चळवळ वाढवत आहेत, याबद्दलची चिंता माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले की, या परिस्थितीत डॉ. इंद्रजित आल्टे यांनी अभ्यासपूर्वक साधार लेखन करुन अनुसूचित जाती आणि जमातीची सद्यस्थिती समोर आणली आहे. या पुस्तकाचा आशय पाहता सजग नागरिकांना लोकशाही टिकविण्याचे आव्हान लक्षात येईल. डॉ. आल्टे लिखित ‘अनुसूचित जाती-जमाती आणि आर्थिक-सामाजिक न्याय भ्रम आणि वास्तव’ पुस्तकावरील परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. 

पीईएस इंजिनअरिंग कॉलेजच्या सम्राट अशोक सभागृहात झालेल्या परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, डॉ. इंद्रजित आल्टे, श्रीमती आल्टे, मंगल खिंवसरा, जे. एल. म्हस्के आणि भंते शांतिदूत यांची प्रमुख उपस्थिती होती. २०११ च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या २० कोटी १३ लाख आणि जमातीची १२ कोटी सहा लाख आहे. ही भारतातील २५ टक्के जनता आहे. दलितांचा खूप विकास झाला असून, त्यांना आरक्षणाची गरज नसल्याचा भ्रम पसरवला जात आहे. देशात अनुसूचित जातीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात ३.२७ आणि अनुसूचित जमातीच्या विकासासाठी २.४७ टक्के तरतूद असते. सरकार कमी निधी देत असल्यामुळे विकास खुंटला आहे. विकासाची दरी पाहिल्यास वास्तव कळते, असे डॉ. आल्टे म्हणाले. डॉ. एस. एल. मेढे आणि प्रा. भारत सिरसाट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पुष्कर आल्टे यांनी संचालन केले.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडियाAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक