शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ऑरिकमध्ये पूर्ण टप्प्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 2:20 PM

कमांड कंट्रोल सेंटर व इतर सुविधांचे लोकार्पण 

ठळक मुद्देपहिला टप्पा पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार२०२२ पर्यंत तिसऱ्या टप्प्याचे काम व्हावे

औरंगाबाद : ऑरिकमध्ये ७० हजार कोटींची गुंतवणूक २०२२ पर्यंत टप्प्याटप्प्याने होईल, असा दावा राज्यकर्ते चार वर्षांपासून करीत आहेत. अद्याप त्यातील १० टक्केही गुंतवणूक पूर्ण रूपात ऑरिकमध्ये आलेली नाही. शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते ऑरिक हॉल, कमांड कंट्रोल सेंटर, रोड सिस्टिम नेटवर्क, लॅण्ड सिस्टम आणि अ‍ॅमेनिटीजचे लोकार्पण होणार आहे. महिला उद्योग सक्षमीकरणाच्या अनुषंगाने पंतप्रधान भरीव घोषणा करण्याची चर्चा आहे. 

३० लाखांपर्यंत रोजगारनिर्मितीचे लक्ष्य येथील उद्योगनगरीतून आहे. देशातील अत्याधुनिक सुविधांचे नवीन औद्योगिक शहर म्हणजे ऑरिक असेल. ऑरिकमध्ये ऑटोमोबाईल्स क्षेत्र विकसित करण्यासाठी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना सवलती देण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. उद्योग येण्यासाठी ज्या सवलती दिल्या जाव्यात. त्यासाठी उपसमिती गठित केली आहे. त्या समितीलादेखील अधिकार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने डीएमआयसीसाठी ८ हजार कोटींच्या निधीबाबत मागेच निर्णय घेतला आहे. ३ हजार कोटींचा निर्णय २०१५ मध्येच झाला होता. अंदाजे ८०० कोटींचा निधी ऑरिकसाठी मिळालेला आहे. पहिला टप्पाच अजून पूर्ण झालेला नाही. ऑक्टोबर २०१८ पर्यंत शेंद्रा नोडचे काम पूर्ण होणार होते; परंतु ते झाले नाही. बिडकीनमधील काम २०१८ मध्ये सुरू झाले आहे. २०२० मध्ये पहिला टप्पा, २०२१ मध्ये दुसरा टप्पा, २०२२ मध्ये तिसरा टप्पा, असे काम होणार आहे. 

पाणीपुरवठ्याचे दूरगामी नियोजन औरंगाबाद, मराठवाडा हा वॉटर थर्स्ट एरिया आहे. दुष्काळजन्य परिस्थिती कायम आहे. त्यामुळे उद्योगांना येथे गुंतवणूक करताना भीती वाटते. पाण्यामुळे उद्योग बंद पडू नयेत यासाठी ४३ टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यावर, तसेच ५० टक्के पाणी धरणातून घेण्यासाठी नियोजन केले आहे. शहरातील सर्व सिव्हेज वॉटर पुन्हा वापरण्यावर आॅरिकमध्ये भर असेल. पाझर तलाव, वॉटर बॉडीझचे संवर्धन केले जाईल. आॅरिकमध्ये असलेली वॉटर टँक तीन दिवस या नवीन शहराला पाणी पुरेल एवढ्या क्षमतेची असेल. उद्योग येण्यासाठी पाण्याचा अडथळा येणार नाही. यासाठी हा प्रयत्न असणार आहे. 

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादDMICदिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरState Governmentराज्य सरकार