औरंगाबादच्या विनय, पांडुरंग, सुनील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:27 IST2018-03-06T00:26:02+5:302018-03-06T00:27:09+5:30

इम्फाळ येथे ८ मार्चपासून सुरू होणाºया राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादच्या विनय साबळे, सुशील वानखेडे आणि पांडुरंग खरात यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या तिघांशिवाय संघात संदीप गुरव, विभास सेन, गणपत लेंडे, सागर इंगळे, अमोल मोर्तकार व वैशाली थूल यांचा समावेश आहे.

 Aurangabad's Vinay, Pandurang, Sunil in the selection of Maharashtra team | औरंगाबादच्या विनय, पांडुरंग, सुनील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

औरंगाबादच्या विनय, पांडुरंग, सुनील यांची महाराष्ट्राच्या संघात निवड

औरंगाबाद : इम्फाळ येथे ८ मार्चपासून सुरू होणाºया राष्ट्रीय व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेसाठी औरंगाबादच्या विनय साबळे, सुशील वानखेडे आणि पांडुरंग खरात यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या तिघांशिवाय संघात संदीप गुरव, विभास सेन, गणपत लेंडे, सागर इंगळे, अमोल मोर्तकार व वैशाली थूल यांचा समावेश आहे. इम्फाळ येथे होणाºया स्पर्धेतून आशियाई स्पर्धेसाठी भारताचा संघ निवडला जाणार आहे.
या संघाला हेमंत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाला औरंगाबाद जिल्हा व्हीलचेअर फेन्सिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र झाडे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, दिनेश वंजारे, छाया पानसे, संजय भूमकर आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  Aurangabad's Vinay, Pandurang, Sunil in the selection of Maharashtra team