औरंगाबादचे उदय डोंगरे राष्ट्रीय निवड समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 00:24 IST2018-03-06T00:24:07+5:302018-03-06T00:24:23+5:30
औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि अ. भा. तलवारबाजी संघटनेचे सहसचिव उदय डोंगरे यांची भारतीय संघ निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उदय डोंगरे हे राज्य तलवारबाजी संघटनेतही सचिव म्हणून कार्यरत आहेत.

औरंगाबादचे उदय डोंगरे राष्ट्रीय निवड समितीवर
औरंगाबाद : औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि अ. भा. तलवारबाजी संघटनेचे सहसचिव उदय डोंगरे यांची भारतीय संघ निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवड समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. उदय डोंगरे हे राज्य तलवारबाजी संघटनेतही सचिव म्हणून कार्यरत आहेत.
इंडोनेशिया येथे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तलवारबाजी संघ सहभागी होणार आहे. तसेच इटली येथे जागतिक कॅडेट, ज्युनिअर कुस्ती स्पर्धा होत आहे. जागतिक कॅडेट गटातील भारतीय संघाची निवड चाचणी औरंगाबाद येथे ८ मार्च रोजी होणार आहे, तर सीनिअर भारतीय तलवारबाजी संघ ९ मार्च रोजी आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट येथे निवडला जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी होणाºया निवड चाचणीतून उदय डोंगरे यांचा समावेश असलेली निवड समिती भारतीय संघ निवडणार आहे.
उदय डोंगरे यांची निवड समितीवर निवड झाल्याबद्दल अ.भा. तलवारबाजी महासंघाचे खजीनदार अशोक दुधारे, सचिव बशी अहमद खान, मानसिंग पवार, प्राचार्य डॉ. विजय भोसले, भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या पश्चिम विभागाचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, डॉ. संदीप जगताप आणि संजय भूमकर आदींनी अभिनंदन केले आहे.