औरंगाबादची तिसऱ्या क्रमांकाची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: June 14, 2017 00:38 IST2017-06-14T00:36:13+5:302017-06-14T00:38:34+5:30
औरंगाबाद : विभागीय मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात औरंगाबाद जिल्हा हा मागील तीन वर्षांपासून सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे.

औरंगाबादची तिसऱ्या क्रमांकाची हॅट्ट्रिक
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : विभागीय मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात औरंगाबाद जिल्हा हा मागील तीन वर्षांपासून सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरच कायम आहे. औरंगाबादचा निकाल ८९.५६ टक्के एवढा लागला आहे.
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या या परीक्षेस औरंगाबाद जिल्ह्यातील ६४ हजार ३१२ विद्यार्थी बसले होते. यापैकी ५७ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये ३७ हजार ४० मुले आणि २७ हजार २७२ मुलींचा समावेश होता. यापैकी ३२ हजार २७१ मुले व २५ हजार ३२७ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णांचे मुलांचे प्रमाण ८७.१२ टक्के मुले आणि ९२.८७ टक्के मुली असे आहे.
पुनर्परीक्षार्र्थींच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्र्थींच्या निकालात मात्र औरंगाबाद जिल्ह्याने एक शिडी चढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून बीड जिल्ह्याने पहिल्या (पान ३ वर)