शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशभरातील ‘जेईई’ विद्यार्थ्यांना औरंगाबादच्या सनीचे धडे

By सुमेध उघडे | Updated: January 5, 2020 04:56 IST

देशभरात अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ मेन्स व अ‍ॅडव्हान्स ही एकच प्रवेश परीक्षा आहे.

सुमेध उघडे औरंगाबाद : देशभरात अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ मेन्स व अ‍ॅडव्हान्स ही एकच प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी देशभरातून जवळपास १४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. प्रचंड स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा आणि अभ्यास यामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक आणि मानसिक पातळीवर कस लागतो. मार्गदर्शनासाठी अनेक कोचिंग क्लास आणि विविध पुस्तके उपलब्ध आहेत. ‘जेईई’च्या अभ्यासातील बौद्धिक व मानसिक अडचणी काही विद्यार्थी ‘क्योरा’ या वेबसाईटवर मांडतात.औरंगाबादच्या सनी धोंडकर याने या अडचणीवर तो कशी मात करतो, हे सांगितले. अभ्यास व यादरम्यान येणाऱ्या ताणतणावावर मात करण्याच्या सनीच्या पद्धती वेगळ्या आणि अत्यंत सोप्या असल्याने अल्पावधीतच संपूर्ण देशभरातून हजारो विद्यार्थी त्याला फॉलो करीत आहेत. या माध्यमातून आणि ईमेल करून कोटा, दिल्ली, तामिळनाडू, मुंबई, बंगळुरू, उत्तर प्रदेश येथील विद्यार्थी आपल्या शंकांचे निरसन त्याच्याकडून करून घेतात.सर्वात अवघड प्रश्नाच्याउत्तराला ७० हजार लाईक्ससनीने यावर्षी ‘जेईई-२०१९’ ही परीक्षा दिली असून तो आता आयआयटी मुंबई येथे पुढील शिक्षण घेत आहे. या परीक्षेत सर्वात अवघड प्रश्न कोणता होता, असा प्रश्न ‘क्योरा’वर विचारण्यात आला. तेव्हा जो प्रश्न सोडविण्यास अनेक विद्यार्थ्यांना १५ मिनिटे लागली तो प्रश्न सनीने केवळ ४ मिनिटांत सोडवला. यासाठी त्याने वापरलेल्या उत्तराच्या पद्धतीस ७० हजार फॉलोअर्सनी लाईक केले आहे.‘कन्सेप्ट मॅप्स’चेलाखभर डाऊनलोडअभ्यास प्रभावी पद्धतीने कसा करावा, असे अनेक विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर सनीने स्वत: तयार केलेला ‘कन्सेप्ट मॅप्स’ शेअर केला. यात एक संपूर्ण धडा एकाच कागदावर उतरवून आकलनास सोपा कसा करायचा, हे मांडले आहे. गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून याचे पीडीएफ त्याने सर्वांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. याची उपयुक्ततालक्षात आल्याने आतापर्यंत याचे लाखभर डाऊनलोड आणि शेअर झाले आहेत.पाचवीत विज्ञानकथा;नववीत पहिले पुस्तकसनीला लहानपणासून वाचन लिखाणाचा छंद असून त्याने पाचवीत असतानाच विज्ञान कथा लिहिल्या होत्या. त्या वाचून त्याची आई दीपमाला आणि प्राथमिक शिक्षक ज्ञानेश्वर यांनी त्याला प्रोत्साहन दिले. पुढे नववीतत्याने विज्ञानातील उत्सुकता निर्माण करणाºया प्रश्नांवर‘थिअरी वर्सेस थिअरीज’ हे पुस्तक लिहिले.>अनुभव पुस्तकरूपात मांडलेमला अभ्यासादरम्यान आलेल्या अडचणी इतर विद्यार्थ्यांना येऊ नयेत यासाठी मी सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र आयआयटीत प्रवेश घेतल्यानंतर वेळचे नियोजन होत नसल्याने माझे अनुभव पुस्तकरूपात मांडले आहेत. सोशल मीडियात अनेक विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत मला फॉलो करीत असल्याने जबाबदारीची जाणीव झाली आहे.- सनी धोंडकर, विद्यार्थी, आयआयटी, मुंबई>‘दी जेईई’ विद्यार्थ्यांचा मित्रसोशल मीडियावर ‘जेईई’वरील प्रश्नांची उत्तरे देताना वेळ आणि जागेची कमतरता येत होती. यातून अभ्यासाच्या सोप्या पद्धती एकाच ठिकाणी मांडत सनीने ‘द जेईई’ हे पुस्तक लिहिले आहे. यात ‘जेईई’च्या अभ्यासातील सोप्या पद्धती, अभ्यासातील अडचणी आणि तणाव कसा दूर करावा, यावर स्वानुभवाचे बोल मांडले आहेत.‘इन्फो मेमे’ची धूमअभ्यासादरम्यान तणाव कमी करण्यासाठी सनीने ‘इन्फो मेमे’ ही संकल्पना राबवली. फेसबुक पेजवर आणि क्योरावर विचारलेल्या काही प्रश्नांना त्याने विनोदाचा स्पर्श असणाºया ‘मेमे’मधून समर्पक उत्तरे दिली. या पद्धतीने अभ्यासातील तणाव कमी तर झाला; पण आकलनही झाल्याने ‘इन्फो मेमे’ची विद्यार्थ्यांमध्ये धूम झाली.>देशभरातून फॉलोअर्स‘जेईई’ अर्थात जॉइंट एन्ट्रस एक्झामिनेशन या देशपातळीवरील अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना क्योरा या ‘फ्री एक्सेस’ वेबसाईटच्या माध्यमातून सनी धोंडकर मार्गदर्शन करीत आहे. विशेष म्हणजे या परीक्षेच्या तयारीसाठी देशभरात प्रसिद्ध असलेले राजस्थानमधील कोटा येथील विद्यार्थीसुद्धा त्याच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत.