औरंगाबादचे मल्ल राहुल, मनोज यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:52 IST2018-01-25T23:51:59+5:302018-01-25T23:52:29+5:30
नवी दिल्ली येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय पातळीवरील ‘खेलो इंडिया’ कुस्ती स्पर्धेसाठी हर्सूल येथील हरसिद्धि व्यायामशाळेचे मल्ल राहुल कसारे व मनोज घनवट यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राहुल कसारे ५४ किलो वजन गटाच्या फ्री स्टाईल प्रकारात, तर मनोज घनवट हा ५0 किलो ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

औरंगाबादचे मल्ल राहुल, मनोज यांची निवड
औरंगाबाद : नवी दिल्ली येथे ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणाºया राष्ट्रीय पातळीवरील ‘खेलो इंडिया’ कुस्ती स्पर्धेसाठी हर्सूल येथील हरसिद्धि व्यायामशाळेचे मल्ल राहुल कसारे व मनोज घनवट यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. राहुल कसारे ५४ किलो वजन गटाच्या फ्री स्टाईल प्रकारात, तर मनोज घनवट हा ५0 किलो ग्रीको रोमन प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. या दोन्ही मल्लांना एनआयएस कुस्ती प्रशिक्षक प्रा. हरिदास म्हस्के, अर्जुन औताडे व नवनाथ औताडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल हरसिद्धी व्यायामशाळेचे संस्थापक अध्यक्ष पूनमचंद बमणे, शेखलाल पटेल, साईनाथ हरणे, राजू तुपे, शंकर बमणे, माधव वाणी, फुलचंद दुबेले, संतोष फटांगडे, प्रकाश ब्रह्मकर, संजय हरणे आदींनी राहुल कसारे व मनोज घनवट यांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.